मुंबई : दादर, प्रभादेवी, शिवाजी पार्क, माहीमचा भाग असलेल्या माहीम विधानसभेत यावेळी नक्की कोणाविरुद्ध कोणाची लढत होणार आहे हे निश्चित नाही. मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा असा हा मतदारसंघ असून शिवसेनेचे दोन्ही गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे नक्की कोणाला उमेदवारी देणार त्याचे पत्ते अद्याप उघड झालेले नाहीत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचेही नाव या मतदार संघासाठी चर्चेत आल्यामुळे हा मतदार संघ सध्या राजकीय वर्तुळात गाजतो आहे.

शिवसेना भवन, शिवाजी पार्क मैदान आणि परिसर, राज ठाकरे यांचे निवासस्थान अशा महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश असलेला माहीम मतदार संघ सध्या उमेदवारांच्या नावांमुळे चर्चेत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघासाठी मनसे, शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) या तीन पक्षात प्रमुख चुरस होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर विद्यमान आमदार सदा सरवणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा सरवणकर यांनाच संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांचा मुलगा माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांना ही निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे समजते. सदा सरवणकर यांची मुलगी देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्यामुळे सरवणकर कुटुंबाकडून कोणाचे नाव पुढे येते याबाबतच आधी उत्सुकता आहे.

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
savita malpekar bald look in kaksparsh praises Mahesh Manjrekar
“महेशने विचारलं टक्कल करशील का? मी लगेच…”, सविता मालपेकरांनी सांगितला ‘काकस्पर्श’चा किस्सा, म्हणाल्या…
Muralidhar Mohol criticizes Congress for spoiling atmosphere before elections
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस वातावरण बिघडविण्याचे काम करतेय, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची टीका
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…
Aishwarya Rai reaction when was introduced as Aishwarya Rai Bachchan
“मी अभिषेक बच्चनशी…”, ‘ऐश्वर्या राय बच्चन’ अशी ओळख करून दिल्यावर अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात

हेही वाचा…ग्राहक आणि विकासक यांच्यातील ‘ सलोखा ‘ वाढला, महारेराच्या सलोखा मंचाकडून १७४९ तक्रारींचे निराकरण ५५३ तक्रारींवर सुनावणी सुरू

हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्यामुळे महाविकास आघाडीतही हा मतदारसंघ ठाकरे यांच्या वाट्याला येणार हे निश्चि्त आहे. ठाकरे गटाकडूनही सध्या दोन प्रमुख नावे चर्चेत आहेत. माजी आमदार, माजी महापौर आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या विशाखा राऊत यांचे नाव त्यात आघाडीवर आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच तरूण कार्यकर्ते आणि एकेकाळी सदा सरवणकर यांचे खंदे समर्थक असलेले महेश सावंत यांचेही नाव चर्चेत आहे. सावंत हे तरूण असून सरवणकर यांच्याशी ते दोन हात करू शकतात असे सामान्य शिवसैनिकांचे म्हणणे आहे. शिवसैनिकांचा सावंत यांना पाठिंबा असला तरी मातोश्रावरून राऊत यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि एकनिष्ठ उमेदवाराला पहिली पसंती असल्याचे समजते. महेश सावंत यांनी काही वर्षांपूर्वी सरवणकर यांच्यासोबत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे गद्दारांच्या या लढाईत सावंत कशाला उमेदवारी असाही प्रश्न जुने शिवसैनिक विचारत आहेत. मात्र कौटुंबिक कारणांमुळे विशाखा राऊत ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचेही समजते. ठाकरे यांच्याकडून अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.

एका बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माजी आमदार नितीन सरदेसाई हे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असतानाच मध्येच गेल्या काही दिवसांपासून माहीम मतदार संघासाठी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे यांच्या नावामुळे या मतदार संघातील उमेदवारीचे गणितच बदलणार आहे.

हेही वाचा…दोन दिवसांत मुंबईतील १३ विमानांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, तपासणीत सर्व धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न

अमित ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेचे दोन्ही पक्ष त्याग करणार?

अमित ठाकरे माहीममधून उभे राहिल्यास शिवसेना (ठाकरे) पक्ष तिथे उमेदवार देणार का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. वरळीत आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती तेव्हा मनसेने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे त्याची परतफेड होणार का याबाबत उत्सुकता आहे. तसे झाल्यास वरळीत यावेळीही आदित्य ठाकरे यांचा मार्ग सुकर होऊ शकतो. त्याचबरोबर मनसेला काही जागांवर पाठिंबा देण्याचीही तयारी शिवसेना (शिंदे) आणि भाजप महायुतीने दाखवली आहे. शिवडी, माहीम या मतदार संघांचा त्यात समावेश आहे.