मुंबई : विनापरवाना दुचाकी चालवल्यामुळे वाहतुक पोलिसांनी कारवाई केली असता दुचाकीस्वाराने पोलिसाच्या डोक्यात हेल्मेट मारल्याचा प्रकार रविवारी शीव परिसरात घडला. याप्रकरणी वाहतुक पोलिसाच्या तक्रारीवरून शीव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दुचाकीस्वाराला अटक केली आहे. तौसिफ अब्दुल माजिद खान (२७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो कुर्ला एलबीएस रोडवरील शीतल चित्रपटगृहाजवळ राहतो. आरोपी शीव परिसरातील माटुंगा वाहतुक पोलीस चौकी जवळील सिग्नलवर असताना हा प्रकार घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आनंद शेजवळ (४२) हे माटुंगा वाहतुक शाखेत कार्यरत आहेत. ते चौकीजवळील सिग्नलवर वाहतुक नियमनासाठी कार्यरत असता एक तरूण दुचाकीवरून येत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी दुचाकीस्वाराकडे परवाना मागितला. पण त्याच्याकडे चालक परवाना नव्हता. त्यामुळे त्यांनी आरोपीवर दंडात्मक कारवाई केली असता आरोपीला राग आला. त्याने हातातील हेल्मेट वाहतुक पोलिसाच्या डोक्यात मारले व तेथून पळण्याचा प्रयत्न करू लागला.

हेही वाचा : विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पण वाहतुक पोलिसाने मोठ्या शिताफीने त्याला घटनास्थळावरच ताब्यात घेतले. त्यानंतर शीव पोलीस ठाण्यात नेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. भादंवि कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे) व ३३२ (सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे) आदी कलमांतर्गत शीव पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.