मुंबई : आखाती देशातील कंपन्यांमधील नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील अनेक तरूणांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली असून अटक आरोपी उत्तर प्रदेशात व ठाण्यातील भिवंडी येथील रहिवासी आहेत. आरोपींनी रोजगाराच्या शोधत असलेल्या व्यक्तींकडून मोठी रक्कम घेऊन त्यांना नोकरी मिळाल्याचे बनावट कागदपत्रे दिली. त्यानंतर कार्यालय बंद करून पळ काढला.

आरोपींनी बेलार्ड पियर परिसरात बॉम्बे इंटरनॅशनल कन्सल्टन्सी नावाने कंपनी सुरू केली होती. आरोपींनी या कंपनीमार्फत अझरबैझन, ओमान, दुबई, सौदी अरेबिया, कतार व रशिया या देशांतील पाशा कन्स्ट्रक्शन कंपनीतील नोकरीचे आमिष दाखवून तक्रारदार भरत कोळी यांच्यासह ३० ते ४० जणांकडून पैसे घेतले. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी अझर बैजान देशाचा बनावट वर्क व्हिजा, पाशा कंपनीचे बनावट ऑफर लेटर तक्रारदार व इतरांना दिले. त्या बदल्यात अनेकांकडून २० हजार रुपये ते ६० हजार रुपये आरोपींनी घेतले. आरोपींनी फसवणूक केल्याचे लक्षात येताच फसवणूक झालेल्या सर्वांनी कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. मात्र कंपनीचे कार्यालय बंद असल्याचे आढळले. आरोपींनी अनेकांचे पारपत्रही काढून घेतले असून त्या बदल्यात पाच ते दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

Gujarat man on FBI 10 Most Wanted Fugitives list
Crime News : FBIच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत गुजराती व्यक्तीचं नाव; माहिती देणाऱ्याला मिळणार ‘इतक्या’ डॉलर्सचं बक्षीस
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Talbid police have arrested the fugitive gangsters from Ahmedabad and left for Ahmedabad.
अहमदाबादमधून फरारी सराईत पाच गुंडांना कराडजवळ अटक, तळबीड पोलिसांची कारवाई
Crime against city president of Shinde group fraud of Rs 1 crore 56 lakh by lure of job
शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा, नोकरीचे आमिष दाखवून…
Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल
Cash worth Rs 3 lakh stolen from school on Law College Road Pune news
पुणे: विधी महाविद्यालय रस्त्यावरील शाळेतून तीन लाखांची रोकड चोरी
Crime News
Crime News : थिएटरमधून अर्ध्यात सोडून गेल्याचा राग… बंगाली चित्रपटावरून एकाने पत्नीवर झाडल्या गोळ्या

हेही वाचा : “…त्यामुळे जरांगेंनी आमरण उपोषण करून उपयोग नाही”; शर्मिला ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाल्या…

याप्रकरणी तक्रारीनंतर एमआरए मार्ग पोलिसांनी उत्तर प्रदेशातील अमितेश गुप्ता, भिवंडीतील फैजान शेख, मोहम्मद शेख, रामकुमार कुशवाह यांच्यासह १२ जणांविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. आरोपींची आंतरराज्यीय टोळी दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, भिवंडी व मुंबई येथून संगनमताने कार्यरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे गुन्हे शाखेचे सह आयुक्त लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण पाच पोलीस पथके तयार करण्यात आली व त्यांना दिल्ली, लखनौ, गया, भिवंडी येथे पाठविण्यात आले.

हेही वाचा : घाटकोपरमधील बहुमजली इमारतीतील सदनिकेला आग, महिलेसह दोघे आगीत होरपळले

पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली. रामकृपाल रामसेवक कुशवाह (४५, भिवंडी), रोहित महेश्वरप्रसाद सिन्हा (३३, मुंबई), आशिषकुमार मुंगेश्वर माहतो (३०, दिल्ली), आमितेश श्रवणकुमार गुप्ता (४०, लखनौ) व राहुलकुमार शिवान चौधरी (२२, गया) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपी मुंबईतील अंधेरी सहार परिसरात कार्यालय सुरू करून तरूणाची फसवणूक करणार होते. आरोपींकडून तरूणांचे ६३ पारपत्र, अझरबैझन देशाचे एकूण सात बनावट व्हिझा, स्टिकर्स, कागदपत्रे, संगणकीय उपकरणे व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींना यापूर्वीही अटक झाली होती. सध्या जामिनावर असताना त्यांनी तरूणांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

Story img Loader