मुंबई : रेल्वे मार्ग, सिग्नल प्रणाली आणि इतर उपकरांची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

Western Railway, block on Western Railway,
मुंबई : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लाॅक
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Sunday Block on Central Railway, Railway Block,
मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक
22 local trains on Western Railway cancelled
Mumbai Local : पश्चिम रेल्वेवरील २२ लोकल फेऱ्या रद्द
Heavy rains in Gujarat many trains cancelled
गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, अनेक रेल्वेगाड्या…
Mumbai - Ayodhya Special Train, Ayodhya Train,
मुंबई – अयोध्या विशेष रेल्वेगाडी
block Western Railway, Goregaon-Kandivali route,
पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक, गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू
Sunday, megablock, Central Railway, Western Railway, local services,
रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

कुठे :ठाणे – दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर
कधी : सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत

हेही वाचा : मुंबई: ट्रॅक मेंटेनरचा लोकलच्या धडकेत मृत्यू

परिणाम : सकाळी ९.४६ सीएसएमटी – बदलापूर, सकाळी १०.२८ सीएसएमटी – अंबरनाथ, दुपारी २.४२ सीएसएमटी – आसनगाव, दुपारी ३.१७ कल्याण – सीएसएमटी दरम्यान जलद लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तसेच या लोकल नियोजित थांब्यासह कळवा, मुंब्रा, दिवा येथे थांबतील. सकाळी ९.५० वाजताची वसई रोड – दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी ११.४५ वाजताची दिवा – वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येईल. दुपारी १२.५५ वाजता वसई रोड – दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. दुपारी २.४५ वाजता दिवा – वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येईल. रत्नागिरी – दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथे स्थगित करण्यात येईल.

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला – वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल/बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी – कुर्ला, पनवेल – वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

हेही वाचा : मुंबई: माटुंगा येथे रेल्वे रुळाला तडा, लोकलचे वेळापत्रक कोलमडले

पश्चिम रेल्वे

कुठे : मुंबई सेंट्रल – माहिमदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : शनिवारी मध्यरात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल सांताक्रूझ – चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नसेल.