मुंबईः स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी ऐरोली टोलनाक्यावर करण्यात आलेल्या नाकाबंदीत दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. याप्रकरणात सराईत टोळी असल्याचा संशय आहे. नवघर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली असून आरोपीकडून सुमारे दोन किलो एमडी आणि मोटरगाडी जप्त करण्यात आली आहे.

१५ ऑगस्ट रोजी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १४ ऑगस्टपासूनच मुंबईतील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंलुंड येथील एरोली नाका येथेही अशाच प्रकारे नाकाबंदी करण्यात आली होती. त्याअंतर्गत मुंबईत प्रवेश करणाऱ्या मोटरीची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक चौहान, सहाय्यक पोलीस निरीक्षक धाडगे व पोलीस उपनिरीक्षक दणाने यांच्या पथकाने एक बलेनो मोटर अडवली. मोटरगाडीची तपासणी केली असता संशयीत भुकटी सापडली. त्यामुळे चालक मोहम्मद कलीम सलीम चौधरीला (२७) मोटरीतून खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर अमली पदार्थ चाचणी कीटच्या साह्याने तपासणी करण्यात आली असता ती पिवळसर पावडर एमडी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर याबाबतची माहिती नवघर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाली. तपासणी केली असता आरोपीकडून दोन किलो २९ ग्रॅम एमडी सापडले. त्याची किंमत दोन कोटी दोन लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेली बलेनो मोटरही पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी चौधरीविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी कुर्ला येथे गाझीमिया दर्ग्याजवळ राहतो. चौधरीची चौकशी केली असता याप्रकरणात साकीब नावाच्या आरोपीचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध सुरू आहे. आरोपीने यापूर्वीही अनेक वेळा अशा प्रकारे अमली पदार्थांची तस्करी केल्याचा संशय आहे. त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
accident on Palm Beach Road, navi mumbai
पाम बीच मार्गावरील अपघातात एक ठार, दोन गंभीर जखमी

हेही वाचा : आरोग्य विभागाची २०० हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रें ! डॉक्टरांच्या निवासाची अवस्था दयनीय…

पोलीस हवालदार हनुमंत सावंत यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आणखी दोन व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींनी एमडी कुठून आणले. याबाबत माहिती मिळविण्यात येत असून आरोपीला बुधवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीकडून मोटर व एमडी असा एकूण दोन कोटी सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.