मुंबई : पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या २४१७ घरांच्या दुरुस्तीचे काम म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मागील काही दिवसांपासून सुरु आहे. २४१७ पैकी पहिल्या टप्प्यात काही घरांची दुरुस्ती पूर्ण करून त्याचा पात्र विजेते गिरणी कामगार तसेच त्यांच्या वारसांना दसऱ्याच्या मुहूर्तावर ताबा देण्याचे मुंबई मंडळ आणि गिरणी कामगार सनियंत्रण समितीचे नियोजन होते. मात्र आता हा मुहूर्त मागे पडला असून आता दिवाळीत घरांचा ताबा देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अंदाजे ५०० पात्र विजेत्यांना दिवाळीत ताबा दिला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील कोन, पनवेलमधील २४१७ घरांसाठी २०१६ मध्ये सोडत काढण्यात आली होती. मात्र ही घरे करोनाकाळात अलगीकरणासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याने, त्यानंतर ही घरे परत करण्यास विलंब झाल्याने, करोनाकाळात घरांची दुरवस्था आणि शेवटी या घरांच्या दुरुस्तीचा वाद निर्माण झाल्याने ताबा रखडला. अनेक विजेत्यांची पात्रता निश्चिती पूर्ण झाली असून यातील काही विजेत्यांनी घराची १०० टक्के रक्कम भरली आहे. असे असतानाही घरांचा ताबा मिळत नसल्याने विजेते अडचणीत आले आहेत. पण आता अखेर लवकरच घरांची १०० टक्के रक्कम भरलेल्या ५०० विजेत्यांना घरांचा ताबा मिळणार आहे.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

हेही वाचा : विश्लेषण : मुंबईत डेंग्यू रुग्णवाढ अद्याप आटोक्यात का नाही?

राज्य सरकारने मध्यस्थी करून दुरुस्तीचा वाद निकाली काढला आहे. त्यानुसार सध्या २४१७ घरांची दुरुस्ती वेगात सुरु आहे. दरम्यान दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिल्या टप्प्यात ५०० घरांची दुरुस्ती पूर्ण करून या घरांचा ताबा देण्याचे मुंबई मंडळ आणि सनियंत्रण समितीकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र आता हा मुहूर्त चुकला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने हा मुहूर्त चुकला आहे. दरम्यान सुनील राणे यांनी नुकतीच कोनमधील घरांच्या दुरुस्तीची पाहणी केली. दिवाळीआधी किमान ५०० घरांची दुरुस्ती प्राधान्यक्रमाने पूर्ण करावी, असे आदेश यावेळी त्यांनी मुंबई मंडळाला दिले. याअनुषंगाने दिवाळीत ५०० विजेत्यांना घरांचा ताबा दिला जाईल असे राणे यांनी जाहीर केले आहे. तर उर्वरित घरांची दुरुस्ती डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.