मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील १३ स्थानकांजवळ ५०० झाडे लावली असून आता आणखी २६०० झाडे लावण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. त्यामुळे आता ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील स्थानकांचा परिसर हिरवागार होणार आहे. एमएमआरसीने उच्च न्यायालयात सादर केलेल्या हमीपत्रानुसार ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील स्थानक परिसरात झाडे लावण्यास सुरुवात केली आहे. सीप्झ, एमआयडीसी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक, सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड या १३ मेट्रो स्थानकांजवळ ५०० हून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. आता इतर स्थानकांजवळ २६०० झाडे लावण्यात येणार आहेत. एमएमआरसीने मुळ जागी वृक्षारोपण करण्यासाठी तीन कंत्राटे दिली आहेत.

हेही वाचा : पोर्शे घटनेच्या परवाना निलंबन कारवाईला आव्हान; ठाकरे कुटुंबीयांच्या मालकीच्या ड्रमबीटसह बारमालकांना दिलासा नाहीच

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai mmrc took decision to plant 2600 trees at colaba bandra seepz metro 3 metro stations mumbai print news css
First published on: 06-06-2024 at 14:37 IST