मुंबई : ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ आणि ‘कासारवडवली – गायमूख मेट्रो ४ अ’ मार्गिकांवरील एक आव्हानात्मक आणि अवघड काम पूर्ण करण्यात नुकतेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला यश आले. ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांवरील कापूरबावडी आंतरबदल स्थानकाच्या कामाअंतर्गत चार तुळई (यु गर्डस) यशस्वीपणे बसविण्यात आल्या. प्रत्येक १०० टन वजनाच्या या चार तुळई बसविण्यासाठी आठ तास लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मुंबई : १७ वर्षीय मुलीवर अत्याचाराप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

‘एमएमआरडीए’ने ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’चे काम हाती घेतले आहे. ‘मेट्रो ४’ मार्गिका टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यानुसार नुकतेच या मार्गिकेतील अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक काम ‘एमएमआरडीए’ने पूर्ण केले. ‘एमएमआरडीए’ने १४ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता कापुरबावडी आंतरबदल स्थानकाच्या कामाअंतर्गत पहिल्या ४ तुळई बसविण्यास सुरुवात केली. हे काम पहाटेपर्यंत सुरू होते. हे काम पूर्ण होण्यास तब्बल आठ तास लागले. तत्वज्ञान विद्यापीठ जंक्शनवरील हे स्थानक दुहेरी रचनेचे असून ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेला जोडणारे हे महत्त्वाचे हे स्थानक आहे. या स्थानकाचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. दरम्यान, तुळई बसविण्याच्या कामादरम्यान घोडबंदर रोडवरील अवजड वाहतूक नियंत्रित करून हे काम पूर्ण करण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai mmrda succeeds in installing four beams of 100 ton each within 8 hours in kapurbawdi metro 4 mumbai print news css