मुंबई : पोलिसाकडूनच महिला पोलिसाचा छळ झाल्याचा गंभीर प्रकार ॲन्टॉप हिल परिसरात घडला. याप्रकरणी ॲन्टॉपहिल पोलीस ठाण्यात पोलीस शिपायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिला पोलीस मुंबई पोलीस दलात कर्तव्यावर आहे. ॲन्टॉप हिल परिसरात गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी असताना आरोपी पोलीस शिपायाने समाज माध्यमावरून मानसिक त्रास दिल्याचा आरोप महिला पोलीस शिपायाने केला आहे.
हेही वाचा : “स्वतःला नास्तिक समजतात, मग धार्मिक सणांत काय करतायत?” जनतेच्या मनातील प्रश्नावर जावेद अख्तरांचं चोख उत्तर
तसेच, महिलेसह तिच्या पतीची बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच आरोपीने अनेकदा अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. २१ सप्टेंबर २०२३ ते २७ सप्टेंबर २०२३ दरम्यान ही घटना घडली. शिपायाकडून धमक्या, छळ वाढल्याने महिलेने पोलिसांत धाव घेऊन तक्रार केली. त्यानुसार, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.