मुंबई : केईएम रुग्णालयात जीवन रक्षक प्रणाली धूळखात पडली असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता शववाहिनीही दीड महिन्यांपासून वाहनचालकाविना गॅरेजमध्ये धूळखात पडली आहे. शववाहिनी उपलब्ध नसल्याने रुग्णालयामध्ये मृत्यू होणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह घरी नेण्यासाठी नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खासगी शववाहिनी चालकांकडून नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात येत असल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

केईएम रुग्णालयामध्ये मागील अनेक वर्षांपासून शवागारापासून मृतदेह घरपोच पोचविण्यासाठी महानगरपालिकेची मोफत शववाहिनी पुरवण्यात येत आहे. त्यासाठी केईएम रुग्णालयामध्ये दोन शववाहिन्या होत्या. या दोन्ही शववाहिन्यांवर असलेले चालक निवृत्त झाल्यानंतर नव्याने चालकांची नियुक्ती करण्यात आली नाही. शववाहिनीसाठी चालक उपलब्ध नसल्याने दोन्ही शववाहिन्या भायखळा येथील गॅरेजमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. दीड महिन्यांपासून शववाहिन्या नसल्याने ही सुविधा बंद झाली आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मृतदेह घरी नेण्यासाठी खासगी शववाहिनीची व्यवस्था करावी लागते.

maratha reservation more than half mps marathi news
मराठा आरक्षण: राज्यात मराठा खासदारांची संख्या निम्म्याहून जास्त; मग ते मागासलेले कसे ? याचिकाकर्त्यांचा प्रश्न
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Maharashtra Exit Poll Result 2024 Live in Marathi
Maharashtra Exit Poll 2024 : फुटीर राजकारणाला जनतेने मतदानातून उत्तर दिलं? काय सांगतात एक्झिट पोल
NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान
congress demand president rule,
“शिंदे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

हेही वाचा : अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमण यांवर कठोर कारवाई करा, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश

केईएममधील शववाहिनी उपलब्ध नसल्याने खासगी शववाहिनी चालक हे नातेवाईकांकडून मनमानी भाडे आकारत नागरिकांची आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. मागील दीड महिन्यांपासून नातेवाईकांना होत असलेला त्रास लक्षात घेत या शववाहिन्या तातडीने रुग्णालयाच्या सेवेत आणाव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनाचे (उबाठा) माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिला आहे. दरम्यान यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या परिवह विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी केईएम रुग्णालयामध्ये सध्या शववाहिनी व चालक उपलब्ध असल्याचे सांगितले.