मुंबई : महागडा मोबाइल कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला मुलुंड पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे आरोपी पुण्याहून विमानाने गोव्याला निघाला होता. मात्र माहिती मिळताच विमानतळावर पोहोचलेल्या पोलिसांनी उड्डाणाच्या तयारीत असलेले विमान थांबवून आरोपीला ताब्यात घेतले. गणेश भालेराव (२९) असे या आरोपीचे नाव असून तो पुण्यातील रहिवासी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही दिवसांपूर्वी मुलुंड परिसरात राहणाऱ्या एका तरुणाशी समाजमाध्यमांवरून एका व्यक्तीने संपर्क साधला. आपल्याकडे एक महागडा मोबाइल असून तो कमी किमतीत विकत असल्याचे त्याने तरुणाला सांगितले. तरुणाचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने त्याला एक बँक खात्याचा क्रमांक देऊन त्यात ८४ हजार रुपये पाठवण्यास सांगितले. तरुणाने त्या खात्यात पैसे जमा केले. मात्र त्यानंतर आरोपीने आपला मोबाइल बंद केला.

हेही वाचा : मुंबई : उद्वाहनासह पहिला पादचारी पूल कांदिवलीमध्ये!

अनेक दिवस संपर्क साधूनही आरोपीचा काहीही पत्ता लागत नसल्याने तरुणाने याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीची ओळख पटवली. पुणे येथे राहणारा हा आरोपी दोन दिवसांपूर्वी पुण्याहून त्याच्या मैत्रिणीसोबत गोवा येथे विमानाने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे मुलुंड पोलीस पुणे विमानतळावर पोहोचले. विमान उड्डाण करण्याच्या तयारीतच होते. मात्र पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांना आरोपीविषयी माहिती दिली आणि उड्डाणाच्या तयारीत असलेले विमान थांबविण्यात आले. त्यानंतर विमानात बसलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.