मुंबई : मुलुंडमधील प्रकल्पबाधितांसाठीच्या घरांना विरोध करण्यासाठी मुलुंडमधील रहिवाशांनी रविवारी आंदोलन केले. प्रकल्पबाधितांच्या घरांसाठी असलेला पीएपी म्हणजेच प्रोजेक्ट अफेक्टेड पिपल (पीएपी) हा प्रकल्प रद्द करा अन्यथा पुढच्यावेळी आक्रमक आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

मुलुंडमध्ये धारावीतील प्रकल्पबाधितांना जमीन देण्यास विरोध सुरू असतानाच आता मुलुंडमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिका निर्मिती करण्याच्या प्रकल्पालाही विरोध वाढू लागला आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर प्रकल्प रद्द करण्याच्या घोषणा लोकप्रतिनिधींना केल्या होत्या. मात्र प्रकल्पाचे काम अद्याप सुरू असल्यामुळे मुलुंडमधील रहिवाशांनी रविवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
khamgaon buldhana assembly constituency
खामगावात आकाश फुंडकर – दिलीप सानंद यांच्यात चुरशीची लढत; गटबाजी, मतविभाजन निर्णायक
ajit pawar jayant patil
Ajit Pawar: “ऊस उत्पादकांना पैसे देऊ न शकणाऱ्यांना मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न”, अजित पवारांची जयंत पाटलांवर बोचरी टीका

हेही वाचा : मुंबईतील रस्ते वाहतूक विस्कळीत होणार, १ ऑगस्टपासून शीव उड्डाणपूल बंद

मुलुंड पूर्वेकडील मुलुंड गाव परिसरात मराठा मंडळ हॉलजवळ मुंबई महापालिकेतर्फे प्रकल्पग्रस्तांसाठी घरे बांधण्याचा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पातून पालिकेला ७,४३९ सदनिका मिळणार आहे. पालिकेच्या विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना पर्यायी घरे देण्यासाठी या सदनिका बांधल्या जाणार आहेत. या प्रकल्पाला मुलुंडमधील रहिवाशांनी विरोध केला आहे. डिसेंबर २०२३ पासून मुलुंडवासियांचे या प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरू आहे. मुलुंडमधील भाजपच्या सर्व प्रतिनिधींना या आंदोलनात रहिवाशांची साथ दिली होती. मात्र रविवारी या आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षाने नेतृत्व केले नव्हते. त्यामुळे मुलुंडमधील नागरिकांमध्ये याविषयावरून राजकीय पक्षांविरोधातील नाराजी दिसू लागली आहे.

मुलुंडची लोकसंख्या आधीच एक लाख इतकी आहे. त्यात चाळीस हजाराने ही लोकसंख्या वाढली तर मुलुंडच्या मूलभूत सुविधांवर ताण येईल. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला असून आज रस्त्यावर उतरून हा रोष व्यक्त केलेला आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्ते ॲड. सागर देवरे यांनी दिली. यावेळी धर्मराज्य पक्षाचे कामगार नेते राजन राजे, कामगार नेते विश्वास उदगी उपस्थित होते.

हेही वाचा : मुंबई: दिवे लावण्यावरून झालेल्या वादात ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, तिघांना अटक

साडे सात हजार घरांचा प्रकल्प मुलुंडमध्ये होणार नाही, बाहेरून लोक येणार नाही, आम्ही वकीलपत्र घेऊ, आमचे मंत्री सह्या करतील आणि प्रकल्प थांबेल अश्या खोट्या आश्वासने लोकसभेत अनेक नेत्यांनी दिली. त्यांची आठवण आज करून देणे गरजेचं आहे, असाही टोला यावेळी देवरे यांनी लगावला.

हेही वाचा : High Court : तीन मुलांच्या पित्याबरोबर पळून गेली, उच्च न्यायालयाकडून सुरक्षा प्रदान, आंतरधर्मीय जोडप्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती म्हणाले…

या प्रकल्पात येणाऱ्या नागरिकांची यादी तयार नाही, कोण येणार याची स्पष्टता नाही त्यामुळे हा प्रकल्प एक घोटाळा आहे, असाही आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मुलुंडला आधी क्षेपणभूमी, मग धारावी प्रकल्पबाधित मग पीएपी असे अनेक प्रकल्प लादले जात असून त्याविरोधात आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.