मुंबई : मालाड मालवणी येथे एका सार्वजनिक शौचालयाच्या गटारात तीन तरुण पडल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. मालवणी गेट क्रमांक ८ येथे घडलेल्या या घटनेतील तिघांना बाहेर कढण्यात यश आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यापैकी दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मालाड पश्चिमेला मालवणी येथील अंबूजवाडी परिसरात संध्याकाळी ५.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. शौचालयाच्या १५ फूट खोल मल:निस्सारण वाहिनीत तीन तरूण पडले. या शौचालयाची देखभाल एका खासगी कंत्राटदाराद्वारे करण्यात येत आहे. मात्र, त्याचे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा…रेल्वेचा भूखंड ताब्यात न आल्याने धारावी पुनर्विकासात अडसर!

या तीन तरुणांना परिसरातील नागरिकांनी बाहेर काढले व पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. तिघांपैकी सुरज केवत (१८) आणि बिकास केवत (२०) या दोघांचा मृत्यू झाला. तर रामलगन केवत (४५) यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.