मुंबई : चुनाभट्टी परिसरात रविवारी दुपारी पूर्ववैमनस्यातून तीन ते चार जणांवर गोळीबार करण्यात आला आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे तर इतर तीनजण जखमी झाले असून त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ठाण्यातही विशेष मुलांसाठी उपचार केंद्र सुरू होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

दुपारी साडेतीनच्या सुमारास चुनाभट्टी येथील आझाद गल्ली परिसरात गोळीबारची घटना घडली आहे. दोघांनी आठ ते दहा राउंड गोळीबार केला आहे. यामध्ये सुमित येरूनकर यांचा मृत्यू झाला आहे. चुनाभट्टी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.