मुंबई : माहिममधील भागोजी किर मार्ग परिसरात पूर्ववैमनस्यातून एका गटाने केलेल्या हल्ल्यात एक जण जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनिरुद्ध गोड (३२) व त्याचा मित्र योगेंद्र पारखे या दोघांवर संकेत साठे व त्याच्या साथीदारांनी हल्ला केला. लोखंडी रॉड, काठीने या दोघांना मारहाण करण्यात आली. या हाणामारीत योगेंद्र गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अनिरुद्ध गोड याच्या तक्रारीवरून माहिम पोलीसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
फिर्यादी अनिरुद्ध गोड याचे माहिमच्या कपडा बाजारात हॉटेल आहे. या हॉटेलची तक्रार करण्यावरून उभयतांमध्ये वाद झाला होता. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले.
संकेत साठे व त्याच्या साथीदारांनी अनिरुद्ध आणि योगेंद्र या दोघांना मारहाण केली. त्यात योगेंद्र गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
First published on: 11-05-2024 at 22:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai one injured in mahim attack over past enmity case registered against three mumbai print news psg