मुंबई : माहिमच्या रहेजा उड्डाणपुलावर हेरॉइन विकण्यासाठी आलेल्या २६ वर्षीय तरुणाला शाहूनगर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून ५४ लाख रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरफराज अब्दुल माजिद अहमद (२६) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तराखंड येथील रहिवासी आहे. आरोपी सध्या वसई-नायगाव येथे वास्तव्यास होता. शाहूनगर पोलिसांचे पथक रविवारी रात्रीच्या वेळेस गस्त घालत असताना शीव-माहीम जोड मार्गावरील रहेजा उड्डाणपुलावर एक तरुण संशयास्पद हालचाली करताना पथकाच्या नजरेस पडला.

हेही वाचा…स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीसाठी वंचितचा धुळे येथील उमेदवार उच्च न्यायालयात

पोलिसांना त्याला रोखले आणि अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २७० ग्रॅम हेरॉईन सापडले. याशिवाय सरफराज अहमद नावाचे आधार व पॅनकार्ड, एक मोबाइल व पाच हजार रुपये रोख असा मुद्देमाल आढळला. त्याने हा हेरॉईनचा साठा कोठून आणला होता. तसेच ते तो कोणाला विकणार होता याचा पोलीस शोध घेत आहेत.