मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी पीडित मुलीवर वेगवेगळ्या वेळी अत्याचार केला असून मुलगी गर्भवती आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : भारतात मानसिक आजार दुर्लक्षित, मनोरूग्ण दोषसिद्ध आरोपीला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
पीडित मुलीच्या मावशीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १७ वर्षांची असून २२ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी २८ वर्ष व ३० वर्ष वयोगटातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. तर इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
First published on: 16-12-2024 at 12:39 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai police case registered against four for rape of 17 year old girl mumbai print news css