मुंबई : गणेशोत्सवाला केवळ दोन महिने शिल्लक असून बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने उत्सवाची तयारी सुरू केली आहे. समितीने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची एक बैठक २२ जून रोजी आयोजित केली आहे. यावर्षी ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरू होत आहे. केवळ दोन महिने शिल्लक असून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याच्यादृष्टीने पालिका प्रशासनानेही तयारी केली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव वेगळा असण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी मंडळांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा : “नाटयगृहांवरील कर, देखभालीची जबाबदारी सरकारची”, शरद पवार यांचे मत

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai preparation of ganesh festival 2024 started mumbai print news css
First published on: 15-06-2024 at 14:52 IST