Mumbai Puja Path on Railway Track: हार्बर मार्गावरील चेंबूर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रूळावर पूजापाठ करण्याचा प्रकार घडला. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भक्त पूजापाठचा प्रकार होत असताना, मध्य रेल्वे प्रशासनाला हा प्रकार रोखणे अवघड जात असल्याचे निर्दशनास येत आहे. एकीकडे मध्य रेल्वे प्रशासन रेल्वे रूळ ओलांडू नका, रेल्वे परिसरात कचरा फेकू नये, याबाबत सातत्याने जनजागृती करते. तर, दुसरीकडे वर्दळीच्या रेल्वे स्थानकांदरम्यान भक्तांकडून पूजापाठ, कर्मकांड केले जात असल्याचे उघडकीस आले आहे.

रेल्वे रुळाजवळ नारळ फोडणे, फुले-हार वाहणे, अगरबत्ती पेटवण्याचे प्रकार होत आहेत. या रुळावर मरीआई, यल्लमा, लक्ष्मी देवी अशा विविध नावाच्या देवीचे मंदिर असल्याची धारणा भक्तांची आहे. आषाढी एकादशीपासून येणाऱ्या अमावास्येपर्यंत दर मंगळवार आणि शुक्रवारीही पूजा होते. त्यामुळे लोकल सेवा खोळंबते. हा रेल्वे रूळ प्रचंड रहदारीचा असल्याने या प्रकारामुळे मोठा रेल्वे अपघात होण्याची शक्यता असून प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते.

Konkan Railway, Konkani passengers, Konkan,
कोकणी प्रवासी कायम दुर्लक्षित
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Mumbai, Speed ​​limit,
मुंबई : राम मंदिर – गोरेगाव – मालाड विभागात वेगमर्यादा
lpg cylinder on railway track
उत्तर प्रदेशात पुन्हा रेल्वेचा अपघात घडवण्याचा प्रयत्न; कानपूरजवळ रेल्वे रुळावर आढळले गॅस सिलिंडर; एका महिन्यातली पाचवी घटना
Noise and light pollution during Ganpati Visarjan procession of Pune
लोकजागर : सांस्कृतिक शहराचा ‘प्राण’ गुदमरू नये!
Traffic of express trains continues on the third and fourth lines of central railway
तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेवरुन एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची वाहतुक सुरूच
kdmc issue notices illegal shops near kopar railway station
कोपर रेल्वे स्थानकाजवळील बेकायदा गाळ्यांना नोटिसा; रेल्वे मार्गातील जिना बंद करून गाळ्यांची उभारणी
Koper news
डोंबिवली: कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी

हेही वाचा : म्हाडाला १२०० कोटी ? पत्राचाळीतील तीन भूखंड विक्रीचा निर्णय; लवकरच निविदा

चेंबूरमधील रेल्वे रुळावर मरीआईचे मंदिर होते. मात्र, रेल्वे रुळामुळे मंदिर पाडण्यात आले. त्यानंतर पुढे भाविकांनी रेल्वे रुळाजवळ पूजा करण्यास सुरुवात केली. कुर्ला, चेंबूर येथील भाविक याठिकाणी येतात. श्रावण महिन्यात भाविक तेथे पूजा करतात. या वर्षीही पूजा करण्यात आली.

हेही वाचा : Sandeep Deshpande : “…मग तुम्ही काय डोनाल्ड ट्रम्प आहात का?” आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर!

चेंबूर येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळावर काही जणांनी पूजा केली. मात्र हा प्रकार अंधश्रद्धेचा आहेत. यामुळे नागरिक व प्रवाशांच्या जीविताला धोका पोहचवू शकतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या विरोधात पावले उचलणे अपेक्षित आहे. तसेच समितीकडून याविरोधात कार्यवाही केली जाईल.

प्रवीण देशमुख, राज्य कार्यकारणी सदस्य, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती