मुंबई : अयोध्येतील राम मंदिरात आज श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त्याने प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येपासून मुंबईतील रेल्वे स्थानकावर रोषणाई करण्यात आली आहे. मुंबईत दररोज हजारो देशासह परदेशातील पर्यटक येतात. मुंबईत सर्वाधिक आकर्षित करणारी वास्तू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातील पुरातन वारसा दर्जा प्राप्त वास्तू आहे. देशात ताजमहालनंतर या वास्तूची सर्वाधिक छायाचित्रे काढली जातात. लाखो प्रवाशांचा येथून प्रवास होतो. त्यामुळे प्रत्येक या वास्तूचे दर्शन होते. तसेच आकर्षक रोषणाई असल्याने, प्रवासी हमखास मोबाइलमध्ये या हेरिटेज वास्तूचे छायाचित्र काढतात. अयोध्येतील सोहळ्याच्या पूर्वसंध्येला, रविवारी सायंकाळपासून या वास्तूला भगव्या, पिवळ्या रंगाची विद्युत रोषणाई केली होती. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने, अनेक पर्यटकांची रेलचेल या परिसरात होती. विविध बाजूने या वास्तूचे छायाचित्रे टिपली जात होती. तसेच दादर, एलटीटी, ठाणे या टर्मिनसवर देखील रोषणाई केली होती. ही टर्मिनस देखील नयनरम्य दिसून येत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : अटल सेतूवरील पहिला अपघात कॅमेऱ्यात कैद; ताबा सुटल्याने थेट दुभाजकाला दिली धडक, पाहा Video

मुंबईला भेट देणाऱ्या पर्यटकांना भारतीय रेल्वेचा इतिहास समजावा, भारतीय रेल्वेच्या दळणवळणातील टप्पे त्यांना अभ्यासात यावेत, यासाठी २०१० साली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १८ जवळील मोकळ्या जागेत हेरिटेज गॅलरी आहे. या हेरिटेज गल्लीत ब्रिटिशकालीन वाफेवर चालणारी क्रेन, स्टोन क्रशर मशीन, पहिले इलेक्ट्रिक इंजिन, हॅण्ड ट्यूब फायर इंजिन, काँक्रीट मिक्सर, प्रिंटिंग प्रेस मशीन अशा ऐतिहासिक यंत्रणा आहेत. या ‘हेरिटेज गल्ली’ ला दररोज शेकडो पर्यटक भेट देतात. यामधील प्रत्येक यंत्रणेला, इंजिनाला रंगबेरंगी विद्युत रोषणाई केली होती. शहर, उपनगरातील इतर वेगवेगळ्या स्थानकांचे परिसरही रोषणाईने सजले होते.