मुंबईः सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. करोना केंद्रांसाठी देण्यात आलेल्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी हे छापे टाकण्यात आले असून शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे सुजीत पाटकर यांच्या मालमत्तेवरही छापा टाकण्यात आला आहे. याशिवाय एका सनदी अधिकाऱ्यांच्या ठिकाणावरही ईडीने छापा मारल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… मुंबई: मतदार नोंदणीत राज्यातील तरुणाई उदासीन

हेही वाचा… दडपशाहीच्या विरोधात लढणार – सुप्रिया सुळे

सुजीत पाटकर यांच्यासह आणखी तिघांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ईडीने हे छापे मारले आहेत. संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर याप्रकरणी रडारवर आले असून करोना केंद्रातील कंत्राटाप्रकरणी सुजित पाटकर आणि अन्य तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनुसार आझाद मैदान पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट कागदपत्र सादर करणे, फौजदार विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमय्या यांच्या तक्रारीनुसार, याप्रकरणी ३८ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी लाईफ लाईन रुग्णालयाच्या व्यवस्थापन सेवेसह डॉ हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai regarding bmc corona center contract scam allegations ed raid 15 places mumbai print news asj
Show comments