मुंबई : ‘धारावी बचाव मंच’ या संघटनेने धारावी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला असून संघटनेने आपला वचननामा जाहीर केला आहे. संघटनेचे उमेदवार संदीप कटके यांनी ५०० रुपयांच्या शपथपत्रावर धारावीकरांसाठी सहा वचने दिली आहेत. त्यात शौचालयाला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच धारावीच्या पुनर्विकासात एकही कुटुंब धारावीच्याबाहेर जाणार नाही, असेही वचन त्यात देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

धारावी मतदारसंघात यावेळी धारावी पुनर्विकासाचा मुद्दा गाजत असून याच मुद्द्यावर काम करणाऱ्या धारावी बचाव मंचचे ॲड. संदीप कटके हे निवडणूक लढवणार आहेत. कटके हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून त्यांनी इतर राजकीय पक्षाप्रमाणेच आपल्या संघटनेचा वचननामा जाहीर केला आहे. ५०० रुपयांच्या शपथपत्रावर हा वचननामा जाहीर करण्यात आला आहे. या वचननाम्यात त्यांनी सहा मुद्द्यांवर भर दिला आहे. धारावीतील लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे अडीचशे लोकांमागे एक शौचकूप इतकी भयावह स्थिती असल्यामुळे वचननाम्यात पहिल्या क्रमांकावर शौचालयाचा मुद्दा घेण्यात आला आहे. तर उर्वरित मुद्द्यांमध्ये धारावी पुनर्विकासाचा मुद्दा घेण्यात आला आहे.

हेही वाचा : दादर – माहीम विधानसभेत भाजपचा मनसेला अप्रत्यक्ष पाठिंबा ? भाजपच्या महिला विभाग अध्यक्षच्या फेसबुक पोस्टमुळे उलटसुलट चर्चांना उधाण

हे आहेत सहा मुद्दे

१) २४ तास मोफत शौचालय

२) दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर दवाखाने, खाजगी रुग्णालयात होणारी रुग्णांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी समिती

३) धारावीतील मुलांना करियर मार्गदर्शन केंद्र उभारणार

४) धारावी कचरामुक्त करण्याचे नियोजन

हेही वाचा : मुंबई: मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक

५) धारावी पुनर्वसन प्रकल्पात प्रत्येक कुटुंबाला घराच्या बदल्यात घर, दुकानाच्या बदल्यात दुकान, गोदामाच्या बदल्यात गोदाम देणार, एकही कुटुंब धारावीच्या बाहेर जाऊ देणार नाही.

६) धारावीतील सर्व लघुउद्योगांचे धारावीतच पुनर्वसन