मुंबई : मुंबईतील सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने समाजमाध्यमावर पॅलेस्टाईन – इस्रायल संघर्षासंदर्भात पोस्ट करीत आपली मते मांडल्यामुळे त्यांना शाळा व्यवस्थापनाने राजीनामा देण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आला आहे. परवीन शेख या गेल्या १२ वर्षांपासून सोमय्या शाळेत सेवा बजावत आहेत, तर मागील सात वर्षांपासून त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परवीन शेख यांनी पॅलेस्टाईन आणि हमास यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणाऱ्या व समर्थनार्थ आशय असलेल्या पोस्टवर लाइक आणि कमेंट करीत मते मांडली होती. यासंदर्भातील वृत्त संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने परवीन शेख यांना चौकशीसाठी बोलाविले. २६ एप्रिल रोजीच्या बैठकीत शाळा व्यवस्थापनाने शेख यांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतरही काही दिवस त्यांनी काम करणे सुरू ठेवले. दरम्यान, शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला असून शाळेच्या विकासासाठी १०० टक्के प्रयत्न केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : मुंबई: सागरी सेतूवर नवी पथकर यंत्रणा, जूनअखेरीस सेवेत; पथकर वसुलीतील वेळेत बचत

अद्यापही चौकशी सुरू

‘मुख्याध्यापिका परवीन शेख यांच्या प्रकरणाबाबत सोमय्या शाळा व्यवस्थापनाकडून अद्यापही चौकशी सुरू आहे. ही चौकशी संपल्यानंतर अंतिम निर्णय कळवला जाईल’, असे सोमय्या शाळेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, सोमय्या शाळा व्यवस्थापनाकडून परवीन शेख यांना राजीनामा देण्यास सांगितले, याबाबत कोणतीही स्पष्टता व प्रतिक्रिया देण्यात आली नाही.