मुंबईः ‘बिग बॉस १७’चा विजेता मुनवार फारूकी आमच्या दुकानात आल्याच्या रागातून आमच्यावर अंडी फेकून दंगा घातल्याची तक्रार मिठाईच्या दुकानाच्या मालकाने पायधुनी पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून हॉटेल व्यावसायिक व त्याच्या कामगारांना नोटीस बजावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इफ्तार पार्टीसाठी मंगळवारी फारूकी मोहम्मद अली रोडवर गेला होता. त्यावेळी त्याच्याभोवती प्रचंड गर्दी करून चाहते दंगा करत असल्याची चित्रफीत सध्या समाज माध्यांवर वायरल झाली आहे. त्यावेळी मिनारा मशीद येथील नुरानी या मिठाईच्या दुकानात फारूकी गेला होता. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनीही एकच गर्दी केली होती. यावेळी अचानक अंडी फेकण्यात आली. काही जणांनी तेथे दंगा घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नुरानी दुकानाचे मालक अख्तर नुरानी यांनी पायधुनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

हेही वाचा : अपुऱ्या बसमुळे प्रवासी थांब्यांवरच, बसगाड्यांची वारंवारिताही एक तासावर; गर्दीचा मुंबईकरांना फटका

मुनावर फारुकी आपल्या दुकानात आल्याच्या रागातून तेथील एक हॉटेल मालक व त्याच्या कामगारांनी आपल्यावर अंडी फेकली, शिवीगाळ केली व दंगा घालून मारहाण केली, असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार पायधुनी पोलिसांनी सात जणांविरोधात दंगा घालणे, धमकावणे, बेकायदा जमाव जमा करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्या सात जणांना नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : ‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण

फारुकीला पाहण्यासाठी मंगळवारी मोहम्मद अली रोड येथे चाहत्यांनी गर्दी केली होती. त्याची चित्रफीत समाज माध्यमांवर वायरल झाली आहेत. त्या गर्दीतून वाट काढत फारुकी जात असताना दिसत आहे. यावेळी त्याला धक्काबुक्कीही झाल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी नुरानी मिठाईच्या दुकानात हा वाद झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai shop owner registered police case for big boss winner munawar faruqui 7 booked by police mumbai print news css