मुंबई : कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. गणेशोत्सवानिमित्त कुटुंबियांसह जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. यंदाच्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून उत्सवासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्यांनी एसटीला पसंती दिली आहे. त्यामुळे एसटीच्या १,३०१ बसचे गट आरक्षणासह एकूण २,०३१ जादा बस आतापर्यंत पूर्ण आरक्षित झाल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ ते ७ सप्टेंबर दरम्यान ४,३०० जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबईतून कोकणातील थेट गावी अगदी वाडी-वस्तीपर्यंत फक्त एसटीच सुखरूप पोहोचवते. दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा एसटीतर्फे सुमारे ४,३०० जादा बस सोडण्यात येणार असून त्यापैकी २,०३१ बसचे पूर्ण आरक्षण झाले आहे.

reconstructing 154 year old karnac bridge
कर्नाक पूल जूनपर्यंत सुरू होण्याची शक्यता; दुसरी तुळई लवकरच स्थापित करणार, मध्य रेल्वेकडून ब्लॉकची प्रतीक्षा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sudhir Mungantiwar , Chandrapur Power Station,
“…तर चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच बंद करू,” मुनगंटीवार यांचा इशारा
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक

हेही वाचा : मोफा कायद्याचे भवितव्य पुन्हा महाधिवक्त्यांवर अवलंबून! सुधारणा करण्याचा प्रयत्न तूर्त अयशस्वी

गणेशोत्सव काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानके व बसथांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृहे उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

Story img Loader