मुंबई : एच एन रिलायन्स हॉस्पिटल फाउंडेशन मध्ये मूत्रमार्गामध्ये ब्लॉकेज असलेल्या ७० वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले. या रुग्णावर जानेवारीमध्ये हृदयविकाराची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती, ज्यामुळे त्यांच्या मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाला होता. पूर्वी-अस्तित्वात असलेल्या लघवीच्या समस्यांमुळे आणि अँजिओप्लास्टीनंतरच्या प्रभावी अँटी-प्लेटलेट औषधांच्या प्रभावामुळे ब्लॉकेज दूर करण्यासाठी पारंपरिक शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. शिवाय, पारंपारिक प्रक्रियेमध्ये विद्युत प्रवाहाचा वापर केल्याने रक्तस्त्राव होण्याचा उच्च धोका असतो, ज्यामुळे अँजिओप्लास्टी दरम्यान घातलेल्या स्टेंट प्रभावित होऊ शकतो. रुग्णाच्या वैद्यकीय पथकाशी चर्चा केल्यानंतर, रुग्णाने पारंपारिक पद्धती ऐवजी ग्रीन लाइट लेजर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. परिणामी शस्त्रक्रियेदरम्यान कमीत कमी रक्तस्त्राव झाला व ग्लायसिनऐवजी सामान्य सलाईन वापरणे शक्य झाले, ज्यामुळे विपरीत परिणामांचे धोके कमी झाले.
ग्रीन लाइट लेजर शस्त्रक्रियेमुळे कमीतकमी रक्तस्त्राव आणि स्वच्छ लघवी हे मूत्रमार्गातील अडथळा यशस्वीरित्या काढून टाकता आले. शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात आले.
डॉ. संतोषी नागांवकर, यूरोलॉजी, यूरोलॉजिकल ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरी संचालक सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल म्हणाले की, “६०% पुरुषांमध्ये सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासिया, सतत लघवी होणे, लघवी आंकुचन पावणे, मंद प्रवाह, आणि ताण यांसारख्या लक्षणांमध्ये वाढ होताना दिसते. सामान्यतः, या लक्षणांचे व्यवस्थापन करण्यासाठी वैद्यकीय उपचार हा प्रारंभिक उपाय आहे. तथापि, गंभीर लक्षणे असलेल्या किंवा औषधांना चांगला प्रतिसाद न देणाऱ्या व्यक्तींसाठी, शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली जाऊ शकते. बीपीएचसाठी केलेल्या शस्त्रक्रियांची नेमकी संख्या निश्चित करणे कठीण आहे, कारण ट्रांसरेथरल रिसेक्शन प्रोस्टेट सारख्या अनेक मानक प्रक्रिया लहान आरोग्य सुविधा आणि नर्सिंग होममध्ये केल्या जातात असे डॉ नागांवकर म्हणाले.
“ग्रीनलाइट लेसर तंत्रज्ञानचा वापर देशभरात साधारणपणे १५ ठिकाणी केला जातो. यातील प्रत्येक ठिकाणी वार्षिक सुमारे १०० प्रकरणे हाताळली जातात. याचा विचार केल्यास वर्षाकाठी १२०० ते १५०० शस्त्रक्रिया संबंधित रुग्णालयात केल्या जातात.