मुंबई : मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील शौचालयात उतरलेल्या दोन कामगारांचा बुधवारी मृत्यू झाल्याप्रकरणी पर्यवेक्षक मनोहर नाडर (५१) याला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी बुधवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मालाड (प.) परिसरातील राणी सती मार्गावरील एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. या इमारतीच्या आवारातील ४० फूट खोल शौचालयाच्या टाकीत बुधवारी चार कामगार पडले. हे कामगार सफाईच्या कामासाठी आत उतरले होते. मात्र, बराच वेळ कामगार बाहेर न आल्यामुळे अग्निशमन दलाला वर्दी देण्यात आली.

हेही वाचा : सलमान खान गोळीबार प्रकरण: पंजाबमधून अटक आरोपींना घेऊन पथक मुंबईत दाखल, आज न्यायालयापुढे हजर करणार

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचल्यानंतर कामगारांचा शोध घेण्यात आला. शौचालयाच्या टाकीत तीन ते चार कामगार उतरल्याची माहिती घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्याआधारे कामगारांचा शोध घेऊन तीन कामगारांना बाहेर काढून जोगेश्वरीतील पालिकेच्या ट्रामा केअर रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यापैकी राजू (५०), जावेद शेख (३५) या दोघांचा मृत्यू झाला. तर अकीब शेख (१९) याची प्रकृती गंभीर आहे.

Story img Loader