मुंबई : पुण्यामध्ये अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे आलिशान पोर्श गाडी चालवून दोघांचा बळी घेतल्याच्या घटनेचे समाज मनावर तीव्र पडसाद उमटले असून सदर अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर टीकेची झोड उठू लागली आहे. या प्रकरणात ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देणाऱ्या न्यायालयीन आणि पोलीस व्यवस्थेविरोधात समाजात संतापाची लाट उसळली आहे. समाज माध्यमांवरही या घटनेवर टीकात्मक टिप्पणी होवू लागली आहे. इतकेच नव्हे तर या घटनेबाबत उपहासात्मक संदेश असणारे टी-शर्ट्स आणि कीचेनसारख्या वस्तूंची ई-कॉमर्स साईटवरून विक्री सुरू झाली आहे. त्याचबरोबर या व्यवस्थेवर उपहासपूर्ण टीका करणाऱ्या मीम्स, रील्सचाही सध्या सुळसुळाट झाला आहे.

पुण्यात कल्याणी नगर जंक्शन येथे १९ मे रोजी पहाटे नंबर प्लेट नसलेल्या पोर्श मोटारगाडीने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. ज्या पोर्श गाडीने या दोघांना धडक दिली, त्याचा चालक १७ वर्षांचा म्हणजेच अल्पवयीन असल्यामुळे आरोपीने १५ दिवस येरवडा विभागात वाहतूक पोलिसांबरोबर बसून वाहतुकीचे नियोजन करावे आणि अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहावा, अशी शिक्षा विशेष सुट्टीकालीन न्यायालयाने आरोपीला सुनावली होती. इतक्या गंभीर प्रकरणात निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यवस्थेविरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी लोकांनी ई – कॉमर्स साईट आणि समाज माध्यमांवर ‘इट्स अ ग्रेट डे टू राईट ॲन एसे’, ‘नीड मनी फॉर पोर्श’ असा आशय लिहिलेले टी-शर्ट्स तसेच पोर्श अपघाताचे छायाचित्र असलेली किचेन्स विकण्यात येत आहेत.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
child fell down from the scooter while his mother was driving it viral video on social media
आईची एक चूक पडली महागात! स्कूटर चालवताना चिमुकला रस्त्यावर पडला अन्…, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल

हेही वाचा : मुंबईत दोन दिवस उकाड्याचे

हे संपूर्ण अपघाताचे प्रकरण ज्या पध्दतीने हाताळले गेले त्यावरून उपहासात्मक टीका करण्यासाठी मीम्स आणि रील्सचाही मोठ्या प्रमाणावर आधार घेतला गेला आहे. विशेषत: ३०० शब्दांच्या निबंधाची शिक्षा सुनावण्यावरूनही मीम्सच्या माध्यमातून टर उडवली जात आहे. सध्या समाज माध्यमांवर ‘३०० शब्दांत निबंध कसा लिहावा’, ‘अपघात करा, निबंध लिहा’, ‘लोकांचा जीव ३०० शब्दांचा’ असा मजकूर असलेला आशय आणि त्याअनुषंगाने गंमतीशीर व्हिडीओ असलेले मीम्स सगळीकडे फिरत आहेत. ‘बेल ऐसे होती है’ किंवा पुणे पोलीस नियम मोडणाऱ्यांशी कसे वागतात? असा प्रश्न उपस्थित करत केलेले रील्सही इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवरून व्हायरल होत आहेत. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात न घेता हलगर्जीपणा करत आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात एकीकडे तीव्र नाराजीचा सूर उमटतो आहे. तर दुसरीकडे समाजमाध्यमांवरून उपहासपूर्ण टीका करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून देण्याचाही प्रयत्न केला जात आहे.