Mumbai Local Alert Updates मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील १०-११ फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामांसाठी सीएसएमटीकडे ३६ तासांचा ब्लाॅक घेतला आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० ते रविवार दुपारी १२.३० पर्यंत हा ब्लॉक असून या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते दादर आणि सीएसएमटी ते वडाळा लोकल बंद असतील. त्यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या प्रवाशांचे आणि सीएसएमटीवरून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास करताना खूप कसरत करावी लागेल.

सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १०-११ या फलाटांचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. सध्या या फलाटावर १६ डब्यांच्या रेल्वेगाड्या उभ्या राहू शकतात. त्यामुळे मुंबई ते पुणे धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढविण्यावर मर्यादा येतात. रेल्वेगाडीच्या डब्यांची संख्या वाढवण्यासाठी फलाटांचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १० आणि ११ फलाटांची सध्याची लांबी २९८ मीटरवरून ६८० मीटरपर्यंत विस्तारीत करण्यात येत आहे. फलाटांची लांबी वाढवल्यावर २४ डब्यांची एक्स्प्रेस उभी राहू शकते. या फलाटांची इंटरलॉकिंगची कामे सुरू आहेत. ही कामे ३६ तासांत पूर्ण करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. या ब्लॉकवेळी सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद, धीमा मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल. तसेच अनेक लोकल भायखळाऐवजी दादर, परळपर्यंत चालवण्यात येतील. शेकडो लोकल रद्द आणि अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

MHADA offices are now on lease Mumbai news
म्हाडाची आता भाडेतत्त्वावरील कार्यालये
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
High Court question Home Department and Director General of Police to take action against illegal loudspeakers at religious places mumbai news
धार्मिकस्थळांवरील २,९४० बेकायदा ध्वनिक्षेपकांवर काय कारवाई केली? उच्च न्यायालयाची गृह विभागासह पोलीस महासंचालकांना विचारणा
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
CSMT railway station platform
मुंबई : सीएसएमटी फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम फेब्रुवारीत पूर्ण होणार
Chandivali asalfa five constructions demolished
चांदिवली – असल्फादरम्यानच्या मिसिंग लिंक प्रकल्पातील अडथळा दूर, महापालिकेने पाच बांधकामे हटवली

हेही वाचा : Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेवरील ९३० लोकल फेऱ्या रद्द, ३३ लाख प्रवाशांचे अतोनात हाल; ठाण्याला ६३ तासांचा, सीएसएमटीकडे ३६ तासांचा ब्लाॅक

एसटीच्या जादा बस सेवा

ठाणे स्थानकात फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजेपासून पुढील ६३ तासांचा ब्लाॅक आहे. तसेच सीएसएमटी येथे शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून पुढील ३६ तासांचा ब्लाॅक आहे. ब्लाॅक कालावधीत राज्य परिवहन (राज्य) महामंडळाने मुंबईतील कुर्ला नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी ५० जादा एसटी बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई आगारातील २६ आणि ठाणे आगारातून २४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवासी मागणी लक्षात घेता यात आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांना मार्गदर्शनासाठी ठाणे आणि मुंबई आगारात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

डबेवाल्यांची सेवा सुरू

मेगाब्लॉकचा परिणाम डबे पोहचवण्याच्या व्यवसायावर होण्याची शक्यता आहे. तीन दिवस मेगाब्लॉक जाहीर झाला आहे. शेकडो लोकल रद्द केल्या आहेत. त्यामुळे डबे पोहचवण्याच्या व्यवसायावर ताण येईल. तरी ही अशा परिस्थिती सेवा देण्याची मानसिकता डबेवाल्याची आहे.

हेही वाचा : नवी मुंबई विमानतळ प्रभाव परिसरातील बेकायदा महाकाय फलक चार आठवड्यांत हटवा, उच्च न्यायालयाचे जाहिरात कंपन्यांना आदेश

शुक्रवारी १६१ लोकल फेऱ्या रद्द

ठाणे येथील ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावरील १६१ लोकल फेऱ्या शुक्रवारी रद्द केल्या आहेत. तर, ७ लोकल अंशत: रदद् केल्या आहेत. मात्र, कल्याण ते सीएसएमटी दरम्यान किती लोकल रद्द करण्यात येईल. पीक अव्हरमध्ये कोणत्या लोकल रद्द असतील, याची माहिती देण्यास मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने टाळाटाळ केली.

कर्जत, कसारा लोकल राहणार सुरू

ठाणे येथील ब्लाॅक काळात कर्जत, कसारा अप आणि डाऊन मार्गावरील एकही लोकल फेरी रद्द न करण्याचे नियोजन आहे. १६१ लोकल फेऱ्या रद्द जरी असल्या तरी, प्रवाशांना सीएसएमटीपर्यंत लोकल प्रवास करता येणार आहे. पीक अव्हरमधील कमीत कमी लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : अभ्यासक्रमातील मराठीची उपेक्षा थांबवा – अनिल देसाई; आराखड्यावर अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी

ब्लाॅक पूर्वीच लोकल विलंबाने

सीएसएमटी आणि ठाणे येथील ब्लाॅक सुरू होण्याआधीच लोकल सेवा विलंबाने धावत होत्या. गुरुवारी सकाळपासून लोकल १५ ते ३० मिनिटे उशिराने धावल्या. तसेच, बुधवारी रात्री प्रवाशांना इच्छित स्थानकात पोहचण्यास पाऊण तास उशीर झाला. गुरुवारी लोकलचा लेटलतीफ कारभार सुरू असल्याने सीएसएमटी, भायखळा, कुर्ला, घाटकोपरसारख्या मोठया रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी जमली होती.

ठाणे येथील ५-६ फलाटांच्या रुंदीकरणासाठी गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून सुरु झालेला ६३ तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी १२.३० पर्यंत असणार आहे. या ब्लाॅक कालावधीत रेल्वे मार्गिका हटवून, त्याठिकाणी फलाटाचे २ ते ३ मीटर रुंदीकरण होईल. रुंदीकरणासाठी ७८५ लेगो ट्रीक ब्लाॅकचा वापर केला जाणार आहे. या कामासाठी पोकलेन, क्रेनचा वापर करून युद्धपातळीवर कामे केली जाणार आहेत.

Story img Loader