मुंबई : दोन दिवसांपूर्वी आरे परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड तोडण्यात आले. दरम्यान, आरेमध्ये यापूर्वीही अशाप्रकारे अनेक झाडे तोडण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. आरेमधील पंचवटी परिसरात रस्त्याच्या कडेला मोठी झाडे आहेत. यापैकी एक झाड दोन दिवसांपूर्वी तोडण्यात आल्याचे पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते तबरेझ यांनी सांगितले. यापूर्वीही परिसरातील झाडे तोडण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. हे झाड बऱ्यापैकी मोठे असून ते तोडल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

दरम्यान, कोणतीही पूर्व कल्पना न देता आरे परिसरात एकेक झाड तोडण्यात येते. ही बाब तेथील स्थानिक रहिवासी किंवा पर्यावरणप्रेमींच्या लक्षात आल्यानंतर याबाबत चौकशी केली जाते. झाडे कधी, कशासाठी तोडली जातात हे देखील कळू देत नाही, असे तरबेज यांनी सांगितले. दरम्यान, हे झाड कोणी, कधी तोडले याची चौकशी करून तक्रार केली जाईल, असे तरबेज म्हणाले. तसेच याआधी झाडे का तोडली याचे ठोस कारणही कोणी देत नाही. आत्तापर्यंत अशाप्रकारे बरीच झाडे तोडण्यात आली आहेत. काही महिन्यांपूर्वी चित्रनगरी परिसरातील अनेक झाडे कोणतीही पूर्वकल्पना न देता तोडण्यात आली होती.

Story img Loader