मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईमधील दोन तलावांपैकी एक तुळशी तलाव २० जुलै रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला. गेल्या वर्षी याच दिवशी मध्यरात्री १.२८ च्या सुमारास हा तलाव भरून वाहू लागला होता. ८०४.६ कोटी लीटर अर्थात ८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव २०२२ व २०२१ मध्ये १६ जुलै रोजी, तर २०२० मध्‍ये २७ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी तुळशी हे सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
Two months ago Thane Municipal Corporation requested bmc for 50 million liters of water
ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
Water supply cut off in Malad Mumbai news
मालाडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम

हेही वाचा : Uddhav Thackeray : ‘मुंबईला अदाणी सिटी करण्याचा मोदी-शाहांचा डाव’, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या कृत्रिम तलावाचे बांधकाम १८७९ मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर (८०४६ दशलक्ष लीटर) एवढा असतो. तुळशी तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहणारे पाणी पुढे विहार तलावाला जाऊन मिळते.

Story img Loader