मुंबई: धावत्या लोकलमध्ये शिरून एका चोराने महिला प्रवाशाच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढल्याची घटना १५ दिवसांपूर्वी दादर रेल्वे स्थानकात घडली होती. याप्रकरणी रेल्वे गुन्हे शाखेने तपास करून दोघांना अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तक्रारदार मधुरा गुरव २२ मे रोजी रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून दादर – विरारदरम्यान प्रवास करीत होत्या. दादर रेल्वे स्थानकातून गाडी सुरू होताच अचानक एक चोराने डब्यात प्रवेश केला. क्षणातच त्याने मधुरा यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढला. महिलेने आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत चोरने पोबारा केला होता.

kdmc issue notices illegal shops near kopar railway station
कोपर रेल्वे स्थानकाजवळील बेकायदा गाळ्यांना नोटिसा; रेल्वे मार्गातील जिना बंद करून गाळ्यांची उभारणी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Margaon to Panvel special trains for return journey to Konkankars Mumbai news
मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाड्या, परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांना दिलासा
Railway ticket inspector, passenger saved,
मुंबई : तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान
Heavy rains in Gujarat many trains cancelled
गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, अनेक रेल्वेगाड्या…
young man commits suicide under a running train due to a financial dispute
आर्थिक वादातून तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या
Escalators, Kalyan Railway Station, Kalyan,
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर सरकत्या जिन्यांची उभारणी
A religious twist in the case of assaulting a ticket inspector on the Western Railway Mumbai
मुंबई: तिकीट तपासनीसला मारहाण प्रकरणाला धार्मिक वळण

हेही वाचा : हिवताप, डेंग्यूमुक्त मुंबईसाठी कृती आराखडा तयार करणार; अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचे निर्देश

घटनेनंतर महिलेने मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस आरोपीचा शोध घेत होते. याच दरम्यान लोहमार्ग गुन्हे शाखा युनिट ६ ने समांतर तपास सुरू केला होता. रेल्वे स्थानकावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या माध्यमातून पोलिसांनी चोराची ओळख पटवून मतीउर शेख (३२) याला वाडीबंदर परिसरातून ताब्यात घेतले. यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेले मंगळसूत्र एका साथीदाराकडे ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याचा साथीदार कीर्तिराम नायक (५२) याला अटक केली असून त्याच्याकडून चोरलेले मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले.