मुंबई : पुण्यात ड्र्रीम इलेव्हनवर दीड कोटी रुपये जिंकणाऱ्या पोलिसावरील निलंबनाच्या कारवाईचे प्रकरण ताजे असताना मुंबईतही गणवेशात इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणाऱ्या दोन रेल्वे पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय आणखी दोन रेल्वे पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

गणवेशात रिल्स बनवून समाज माध्यमांवर अपलोड केल्याप्रकरणी दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात एका महिला पोलिसाचा समावेश आहे. मध्य रेल्वेअंतर्गत पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस व पश्चिम रेल्वेअंतर्गत पोलीस ठाण्यात कार्यरत एक पोलीस शिपाई यांनी नुकतीच गणवेशात चित्रफीत तयार करून ती समाज माध्यमांवर अपलोड केली होती. त्याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी विभागीय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे चौकशी सुरू असेपर्यंत या दोनही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
Cyber-fraud with a woman, Mumbai, financial fraud,
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांत अडकल्याची भीती दाखवून महिलेची सायबर फसवणूक
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल

हेही वाचा : Uddhav Thackeray Dasara Melava 2023 : मराठा आरक्षणात भाजपचा खोडा- उद्धव ठाकरे यांचा आरोप

वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गणवेशातील व्यक्तीने शिस्तीचे पालन करण्याची आवश्यकता आहे. शिस्तभंग केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. याशिवाय वसई रेल्वे पोलीस ठाण्यात दोन पोलिसांवर कोचिंक सेंटर चालवल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सेवा नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोन्ही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. असे गैरप्रकार सहन केले जाणार नाहीत. याबाबत योग्य संदेश देणे आवश्यक असल्यामुळे वरिष्ठांनी ही कारवाई केली.

Story img Loader