मुंबई : ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने, अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्य रेल्वेच्या आटगाव-तानशेत दरम्यान भूस्खलन झाल्याने, रेल्वे रुळावर चिखल-मातीचा ढिगारा साचला आहे. तसेच, खडावली-टिटवाळा दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने आणि वाशिंद-खडावली दरम्यान रेल्वे रूळावर पाणी भरल्याने कल्याण ते कसारा दरम्यानची रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. परिणामी, लोकल सेवा बंद झाली असून रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले आहेत.

जालना ते सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस इगतपुरीपर्यंत चालवण्यात येणार आहे. तसेच इगतपुरीवरून जालन्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. परिणामी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. शनिवारी रात्रीपासून मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. रविवारी पहाटेही पावसाचा जोर कायम राहिल्याने ठाणे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत असून सखल भागात पाणी भरले आहे. वाशिंद-खडावली दरम्यान रेल्वे रूळावर पाणी भरले आहे. कल्याण-कसारा दरम्यान रेल्वेगाड्यांचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या मनमाड, नाशिक, इगतपुरीपर्यंत चालवण्यात येणार आहेत. उत्तर भारतात जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या दिवा-वसई रोड-जळगाव या मार्गाने चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक २०७०५ जालना-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस इगतपुरीपर्यंत धावेल. तर, गाडी क्रमांक २०७०६ सीएसएमटी-जालना वंदे भारत एक्स्प्रेस इगतपुरी येथून चालवण्यात येईल. त्यामुळे रविवारचा वंदे भारतचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.

Metro 2A , Metro 7, Metro speed , Metro ,
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ सुसाट, ताशी ८० किमी वेगाने मेट्रो धावणार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
Heavy Vehicles Ban on Ghodbunder Road for metro work
घोडबंदर मार्गावर मेट्रोच्या कामासाठी अवजड वाहतूकीला बंदी; ठाणे वाहतूक पोलिसांनी काढली अधिसुचना
Sleeper Vande Bharat Express , Sleeper Vande Bharat,
नागपूर, पुणे, मुंबईकरिता स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस
mmrda planning to build a creek bridge from kasarvadavali to kharbav in bhiwandi
ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार
Fast paced concreting on Madh Marve road in Malad is causing traffic congection
मढ मार्वे मार्गावरील रस्ते कामात नियोजनाचा अभाव, वाहतूक कोंडीमुळे पाऊण तासाच्या प्रवासासाठी अडीच तास प्रतीक्षा

हेही वाचा : मुंबई: बनावट सोने बँकेत गहाण ठेऊन १.३८ कोटींची फसवणूक, आरोपीला अटक

मुंबईवरून जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतो. मात्र, आता इगतपुरी येथून वंदे भारत सुटणार असल्याने मुंबईतील प्रवाशांना इगतपुरी येथे पोहचणे गैरसोयीचे होत आहे. यासह मनमाड- सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरीपर्यंत चालवण्यात येणार आहे. सीएसएमटी-जालना नाशिकवरून चालवण्यात येणार आहे. नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेस देवळालीपर्यंत आणि सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकवरून चालवण्यात येईल. तर, सीएसएमटी-लखनौ पुष्पक एक्स्प्रेस, एलटीटी-भागलपुर एक्स्प्रेस, एलटीटी-आगरताळा एक्स्प्रेस दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे धावणार आहे.

Story img Loader