मुंबई : महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे अंधेरी (पूर्व) येथील बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रेसिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेसिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन येथे १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी, तसेच, १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दरम्यान, जुनी नादुरुस्त १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी काढून टाकण्याचे ठरविले आहे. हे काम २२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून २३ मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. परिणामी, या दुरुस्तीच्या कामाच्या १६ तासांदरम्यान अंधेरी व आसपासच्या विभागांतील पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

जलवाहिनीन्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर वेरावली जलाशय १, २, ३ ची पाण्याची पातळी सुधारेल. त्यामुळे अंधेरी (पूर्व) व (पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व) व (पश्चिम) आणि विलेपार्ले (पूर्व) व (पश्चिम) या भागांच्या पाणीपुरवठ्यामध्ये कायमस्वरुपी सुधारणा होणार आहे. मात्र, हाती घेण्यात आलेल्या दुरुस्ती कालावधीत के पूर्व, के पश्चिम व पी दक्षिण विभागातील पाणीपुरवठा १६ तास बंद राहणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून व काटकसरीने वापरावे. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
water pipe bursts in Dombivli
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते काम करताना जलवाहिनी फुटली;  पी. पी. चेंबर्सजवळ शेकडो लीटर पाणी वाया
29 villages, Vasai, Vasai latest news, Vasai marathi news,
वसई : २९ गावांचे प्रकरण तापले, सुनावणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप
Water supply cut off in Malad Mumbai news
मालाडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन

हेही वाचा…मुंबई महानगरपालिका क्षेत्रासह वन विभागाच्या हद्दीतील ४१४ पैकी ३०५ झाडांची छाटणी पूर्ण

या परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडित होणार

(नियमित पाणीपुरवठ्याची वेळ)
के पूर्व विभाग – त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, मातोश्री क्लब, दुर्गा नगर (सकाळी ८ ते ९), दुर्गा नगर, सारीपुत नगर (सकाळी १० ते दुपारी १२), दत्त टेकडी, ओबेराय स्प्लेंडर, केलती पाडा, गणेश मंदिर परिसर, जोगेश्वरी – विक्रोळी जोडरस्ता (सकाळी ९ ते सकाळी ११), बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर (सकाळी ११ ते दुपारी २), वांद्रे भूखंड, हरी नगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी (दुपारी १.३० ते दुपारी ३.४०), विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोल डोंगरी, जीवा महाले मार्ग, साई वाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्लेचा बहुतांश भाग (सायंकाळी ५ ते रात्री ८), पंप हाऊस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ (सायंकाळी ५ ते रात्री ८) जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर (रात्री ८ ते रात्री १०.३०)

-पी दक्षिण विभाग – बिंबीसार नगर, बांद्रेकरवाडी, वनराई, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) परिसर (सायंकाळी ७ ते रात्री ९.३० दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा) राम मंदीर मार्ग, गोरेगाव (पश्चिम) (सायंकाळी ७.४५ ते रात्री ९.१५)

हेही वाचा…मुंबई : वडाळा ‘आरटीओ’च्या तिजोरीत ४८३ कोटी

-के पश्चिम विभाग – सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजार, भर्डावाडी, आंब्रे गार्डन पंप (सकाळी ७.३० ते दुपारी १२), जुहू-कोळीवाडा, जुहू तारा मार्ग ( सकाळी ९ ते सकाळी ११), जुहू-कोळीवाडा झोन, देवराज चाळ, स्वामी विवेकानंद मार्ग (जेव्हीएलआर ते जोगेश्वरी बस आगार) (सकाळी ११ ते दुपारी १) एस. व्ही. मार्ग जोगेश्वरी भाग – २, के पश्चिम (पाणीपुरवठा बंद), चार बंगला, डी. एन. नगर, जुहू-वेसावे जोडरस्ता (दुपारी १२.१५ ते २.१० चार बंगला झोनमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा), विलेपार्ले (पश्चिम), लल्लूभाई पार्क, लोहिया नगर, विलेपार्ले गावठाण, मिलन सबवे, संपूर्ण जुहू परिसर, व्ही. एम. मार्ग, नेहरू नगर (दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३०),

हेही वाचा…मुंबईतल्या कॅफे मैसूरच्या मालकाला २५ लाखाला लुबाडलं, ‘स्पेशल २६’ स्टाईल दरोडा

-मोरागाव, जुहू गावठाण (दुपारी २.३० ते सायंकाळी ४.४०), यादव नगर, सहकार मार्ग, बांदिवली हिल, मोमीन नगर, खजूरवाडी, जोगेश्वरी फाटक, जोगेश्वरी स्थानक मार्ग, कॅप्टन सामंत मार्ग (रात्री ९.३० ते रात्री १२), गिल्बर्ट हिल, सागर सिटी, गावदेवी डोंगरी, जुहू गल्ली, वायरलेस मार्ग, श्रीनाथ नगर (रात्री १० ते मध्यरात्री १२.३०)

Story img Loader