मुंबईः पश्चिम द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ४७ वर्षीय कार चालकाचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरगाडीने दुभाजक ओलांडून पलीकडून येणाऱ्या खासगी बसला धडक दिली. त्यात बसचेही नुकसान झाले. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी मृत चालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. बोरीवली येथील मागाठाणे पुलावर हा भीषण अपघात झाला. दहिसरवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मोटरगाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती दुभाजकाला धडकली. पण गाडीचा वेग अधिक असल्यामुळे ती दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकली केली. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या खासगी बसला मोटरगाडीने उजव्या बाजून धडक दिली. त्यावेळी बस चालकाचेही स्टेअरिंग जॅम झाले. बसही दुभाजकावर चढली. तिचे टायर फाटल्यामुळे मोठा आवाज झाला. सुदैवाने बहुसंख्य प्रवासी बसमधून पूर्वीची उतरले होते. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये चालक, क्लीनर व एक प्रवासी होता. अपघातानंतर मोटरगाडी बाजूला पडली होती. त्यात चालक अडकला होता.

अग्निशमन दलाच्या मदतीने चालकाला बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोेषित केले. पोलिसांनी मोटरगाडीतील चालकाच्या नातेवाईकांना बोलावले असता मृत चालकाचे नाव अमित सुरेश अग्रवाल (४७) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते बोरीवली येथील उच्चभ्रू इमारतीतील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी खासगी बसमधील प्रवासी अनिल गुरव (३२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी निष्काळजीपणे मोटरगाडी चालवल्याप्रकरणी अमित अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार गुरव हे मालाड येथील रहिवासी असून रत्नागिरी येथील गावावरून खासगी बसने घरी येत असताना हा अपघात घडला. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने अधिक तपास करत आहे.

no alt text set
BMC Budget 2025 : मालमत्ता कराची थकबाकी २२,५६५ कोटींवर
Garbage collection charges mumbai loksatta news
BMC Budget 2025: मुंबईकरांवर कचरा संकलन शुल्क, कायदेशीर…
BMC Budget 2025 Latest Updates in Marathi, mumbai municipal corporation budget update withdraw of reserve fund charges on garbage
BMC Budget 2025 : पालिका राखीव निधीतून १६ हजार कोटी काढणार? वाढत्या खर्चामुळे महसूल वाढीसाठी धडपड, कचरा शुल्कही लावणार
suraj chavan gets bail from mumbai High court
खिचडी घोटाळा प्रकरण : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना जामीन, वर्षभरानंतर कारागृहातून सुटका
mumbai municipal corporation budget
BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचा ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, आगामी अर्थसंकल्पात १४ टक्क्यांनी वाढ
mhada houses lottery news in marathi
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांसाठी उद्या सोडत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात सोडतीचा कार्यक्रम
torres fraud mumbai news in marathi
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः आतापर्यंत ११,३०० गुंतवणूकदारांची १२० कोटींची फसवणूक
mumbai woman suicide news loksatta
मुंबई : सातव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या
BMC Budget 2025 Live Updates
कचरा संकलन शुल्काचा मुंबईकरांवर भार? महापालिकेचा आज अर्थसंकल्प
Story img Loader