मुंबई : मध्य रेल्वेने सीएसएमटी आणि ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी महा मेगा ब्लाॅक घेतला आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. शनिवारी आणि रविवारही मध्य रेल्वेवर मेगा ब्लाॅक असल्याने या दिवशी प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. ही अडचण दूर करण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाला रविवारचा ब्लाॅक न घेण्याची विनंती मध्य रेल्वेने केली होती. मात्र दोन रेल्वे प्रशासनांमधील संवादाच्या अभावाचा फटका प्रवाशांना बसणार होता. मात्र, प्रवाशांनी पश्चिम रेल्वेकडे याबाबत विचारणा केल्यानंतर, रविवारच्या ब्लाॅकमुळे प्रवाशांचे अधिक हाल होऊ नये, म्हणून पश्चिम रेल्वेने रविवारी, २ जून रोजी घेण्यात येणारा ब्लाॅक रद्द केला.

दोन दिवसांपूर्वी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला आणि मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी विविध यंत्रणा, प्रशासनांनी संपर्क साधून समन्वय राखल्याचे जाहीर केले. यात पश्चिम रेल्वे प्रशासनाला रविवारचा ब्लाॅक न घेण्याचे कळविले असल्याचे सांगितले. मात्र, पश्चिम रेल्वेकडून शनिवारी रात्रकालीन विरार-वैतरणा ब्लाॅक जाहीर केला. तर, रविवारी सकाळच्या वेळीही चर्चगेट – मुंबई सेंट्रल दरम्यान जम्बो ब्लाॅक घेतला. यावरून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागांमध्ये ताळमेळ नसल्याचे उघड झाले आहे. तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत असूनही त्यांचे एकमत होवू शकलेले नाही. यात रेल्वे अधिकारी अपयशी ठरल्याची टीका प्रवाशांकडून होऊ लागली. प्रवाशांनी पश्चिम रेल्वेला ब्लाॅक रद्द करण्याची मागणी केल्यानंतर, पश्चिम रेल्वेने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रविवारचा सकाळचा ब्लाॅक रद्द केला.

sangharsh yoddha manoj jarange patil
‘संघर्षयोद्धा… मनोज जरांगे पाटील’ आणि ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ चित्रपट १४ जून रोजी
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates in Marathi
Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Updates : मुंबईत ठाकरेंचे दोन, भाजपा अन् शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी घोषित; दोन जागांवरचा निकाल प्रतिक्षेत!
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
popular Punjabi singer guru Randhawa reach At Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Cruise Party
Video: अनंत-राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग होतंय ते आलिशान क्रूझ पाहिलंत का? प्रसिद्ध पंजाबी गायकाने व्हिडीओ केला शेअर, म्हणाला…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…

हेही वाचा : महा मेगा ब्लाॅकचा धसका; घरातून कार्यालयीन काम करण्यास कर्मचाऱ्यांची पसंती

पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना आधार

मध्य रेल्वेवरील महामेगाब्लाॅक काळात कल्याण, कसारा, कर्जतवरून दादरपर्यंत येणाऱ्या आणि पनवेल-कुर्ला-दादरपर्यंत येणाऱ्या प्रवाशांना सीएसएमटीकडे जाण्यासाठी, पश्चिम रेल्वेचा आधार घ्यावा लागणार आहे. दादरवरून सीएसएमटीला जाणाऱ्या प्रवाशांना, पश्चिम रेल्वेमार्गे चर्चगेट गाठून रस्तेमार्गाने सीएसएमटी गाठता येणार आहे. बेस्ट, एसटी, स्थानिक महानगरपालिकेच्या बसची व्यवस्था आहेत. मात्र, वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना आधार मिळाला आहे.