मुंबई : वरळी जेट्टीजवळील समुद्रात कृत्रिम शैलभित्ती (रीफ) बांधण्यात आल्या असून मासे, प्रवाळांच्या वाढीसाठी त्या आवश्यक आहेत. वरळी येथे साधारण २०० कत्रिम शैलभित्ती बांधण्यात आल्या आहेत. आरपीजी फाऊंडेशनच्या माध्यमातून या भिंती पाण्यात सोडण्यात आल्या. रत्नागिरीतील जयगड येथे शैलभित्ती तयार करण्यात आल्या आहेत. सिमेंट आणि स्टीलपासून तयार केलेल्या या भिंतींवर हळूहळू शेवाळ वाढण्यास सुरुवात होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… जाळ्यात अडकून १३८ कासवांचा मृत्यू, पोटात आढळली १०० हून अधिक अंडी

हेही वाचा… सन्मानाने मरण्याचा अधिकार – लिव्हिंग विल, इच्छुकांसाठी योग्य ती यंत्रणा उपलब्ध; ३८८ अधिकाऱ्यांची नियुक्ती

किनारपट्टीपासून साधारण ५०० मीटर लांबीवर आणि ७ मीटर खोल या भिंती सोडण्यात आल्या आहेत. एकप्रकारे माशांच्या प्रजातींचे संवर्धन केंद्र म्हणून स्वरूपात त्या काम करतील. या भिंतीमुळे होणारे परिणाम ३ ते ६ महिन्यांनी दिसू लागती. मात्र, त्याचे अंतिम फायदे दिसण्यासाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागेल. या भिंतींचा फायदा फक्त माशांसाठीच नाही तर, कार्बन फुटप्रिंट, जैवविविधतेसाठी, सुनामी यादृृष्टीने अशा अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रदूषणामुळे समुद्रातील माशांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे गेली काही वर्षे मच्छीमारांच्या उत्पन्नात घट होत आहे. कृत्रिम खडक पाण्यातील प्रदूषकांचे प्रमाण कमी करतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai work for artificial rock wall started at worli jetty for conservation of marine biodiversity mumbai print news asj