मुंबई : प्रशिक्षण घेणाऱ्या पोलिसाच्या जेवणात अळी सापडल्याचा गंभीर प्रकार बुधवारी उघडकीस आला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट अपलोड करून त्याबाबत चिंता व्यक्त केली. दरम्यान, याप्रकरणानंतर जेवण पुरवणाऱ्या कॅटरर्सविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलीस दलात रूजू झालेल्या पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. त्यावेळी कलिना येथील प्रशिक्षण केंद्रातील एका प्रशिक्षणांर्थीच्या जेवणात अळी सापडल्याचे ट्वीट संजय पांडे यांनी केले आहे. पोलिसाच्या जेवणात अळी सापडल्याबाबत पांडे नाराजी व्यक्त केली. पोलिसांना अशी वागणूक दिली जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

हेही वाचा : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाबाबत ‘पोस्ट’, मुख्याध्यापिकेवर राजीनाम्यासाठी सक्ती

दोन दिवसांपूर्वी असा प्रकार घडला होता. याप्रकरणी तात्काळ संबंधित कॅटरर्सवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, असे सह पोलीस आयुक्त (प्रशासन) जयकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले.