मुंबई : मित्रांना भेटून घरी परतणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्याच्याकडील दहा हजार रुपयांची रोख रक्कम लुटल्याची घटना चेंबूरमध्ये घडली. याबाबत आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे.

चेंबूरच्या वाशीनाका परिसरात वास्तव्यास असलेला सरफराज शेख (२२) बुधवारी रात्री परिसरातील मित्रांना भेटून दुचाकीवरून घरी जात होता. याच वेळी वाशीनाका परिसरातील नागाबाबा नगर येथे अचानक त्याच्या दुचाकीसमोर चारजण आले. या चौघांनी त्याचे अपहरण केले आणि त्याला गोवंडी परिसरात नेले.

kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
Two arrested on charges of kidnapping and demanding Rs 25 lakhs
अपहरण करून २५ लाखांची मागणी केल्याच्या आरोपाखाली दोघांना अटक
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
thief entered house to robbery into it stole gold chain from neck
घरफोडीसाठी घरात शिरलेल्या चोराने पळवली गळ्यातील सोनसाखळी, आरोपी अटकेत
in pune mobile thief dragged youth and bite his hand for mobile at hadapsar area
मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांनी पादचारी तरुणाला फरफटत नेले, विरोध करणाऱ्या तरुणाचा हाताचा चावा
घरफोडी करणार्‍या आरोपीला २४ तासात बेड्या

हेही वाचा : मुंबईतील घर, कार्यालयांमध्ये चोरी करणारी गुजरातमधील महिलांची टोळी गजाआड

आरोपींनी गोवंडी येथे सरफराजला मारहाण केली आणि त्याच्याकडील रोख १० हजार रुपये रक्कम घेऊन पोबारा केला. याप्रकरणी सरफराजने आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल अझीदूर सदम (३३) याला अटक केली. तसेच पोलीस सदमच्या अन्य तीन साथीदारांचा शोध घेत आहेत.

Story img Loader