मुंबई : रस्त्याने जाणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम काढून चौघांच्या टोळीने पोबारा केल्याची घटना गुरुवारी मुलुंड परिसरात घडली. तरुणाने केलेल्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलुंडमधील विना नगर परिसरात वास्तव्यास असलेला चिराग मकवाना (२४) केशव पाडा विभागातून जात होता. त्यावेळी त्याला रस्त्यात चौघांनी अडवले. या चौघांनी चिरागला बेदम मारहाण केली आणि त्याच्याकडील रोख रक्कम काढून घेतली. त्याच्याकडे जास्त रोख रक्कम नसल्याने आरोपींनी त्याला ऑनलाइन रक्कम देण्यास भाग पाडले. त्यानंतर या चौघांनी तेथून पोबारा केला.

हेही वाचा : ‘महारेरा’ची दलालांसाठी तिसरी परीक्षा २२ नोव्हेंबर रोजी

चिरागने याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून शुभम परमार, जिग्नेश परमार, राहुल वाघेला आणि आकाश मोरे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. यापैकी तीन आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai youth robbed in mulund at veena nagar mumbai print news css