पुणे : महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला आहे. भिडे यांनी महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गांधी यांनी नुकतीच डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गांधी यांच्याकडून दाखल केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई न केल्याने त्यांनी शिवाजीनगर न्यायालयात ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत तक्रार दाखल केली आहे. गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डाॅ. कुमार सप्तर्षी, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अन्वर राजन, मेधा पुरव-सामंत, युवराज शहा यांनीही तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा : “राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचं निवडणूक आयोगाला सांगितलं होतं, पण…”, जयंत पाटलांची टीका

भिडेंविरुद्ध आम्ही डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी या तक्रारीवर कारवाई केली नाही. त्यामुळे न्यायालयात दावा दाखल करुन भिडे आणि पुणे पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे, असे तुषार गांधी यांनी नमूद केले.

हेही वाचा : पुण्यात दोन महिलांचे खंडणीसाठी अपहरण, मोहोळ टोळीतील चार जणांच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पुणे पोलिसांवर दबाव आहे. लोकशाही आणि संविधानास आम्ही माननारे आहोत. न्यायासाठी दाद मागितली आहे. पोलीस जबाबदारी विसरुन राजकीय व्यक्तींसाठी काम करत आहेत, हे चुकीचे आहे, असे गांधी यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune tushar gandhi the great grandson of mahatma gandhi filed a private criminal case against sambhaji bhide pune print news rbk 25 css