मुंबई : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर बदलापूरमधील वातावरण तणावपूर्ण झाले असून नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. या प्रकरणाची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित शाळेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून २० ऑगस्ट रोजीच खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा धक्कादायक प्रकार समोर येऊनही कारवाई करण्यास जाणीवपूर्वक विलंब केल्याचे निदर्शनास आले आहे, असे ‘कारणे दाखवा’ नोटिशीत नमूद केले आहे. तसेच या शाळेमध्ये ‘सीसी टीव्ही’ उपलब्ध असूनही ते बंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपण शासन निर्देशाचे उल्लघंन केल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नोटिशीत म्हटले आहे.

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसी टीव्ही बसविण्यासंदर्भात खाजगी शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. परंतु बदलापूरमधील संबंधित शाळेत ‘सीसी टीव्ही’ उपलब्ध असूनही ते बंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आले असून शाळेने नियमांचे उल्लंघन केले आहे.

criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप
Two arrested in Solapur for vandalizing ST bus
एसटी बसची नासधूस; सोलापुरात दोघांना अटक
pimpri teacher beaten up with hammer
पिंपरी : लिफ्टमध्ये घुसून शिक्षिकेला हातोडीने मारहाण
karve nagar school sexual harassment loksatta news
‘त्या’ नामांकित शाळेबाबत महापालिका शिक्षण विभागाचा अहवाल सादर; काय आढळल्या त्रुटी?
Educational institution director remanded in police custody for negligence in sexual assault case
लैंगिक अत्याचार प्रकरणी दुर्लक्ष केल्याचा ठपका, शिक्षण संस्थाचालकाला न्यायालयीन कोठडी
Institution director arrested in case of abusing school children Pune print news
शाळकरी मुलांवर अत्याचार प्रकरणात संस्थाचालक अटकेत

हेही वाचा >>>अखेर बदलापूर रेल्वे स्थानकात पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांना हटवले, तब्बल दहा तासांनी रेल्वे मार्ग केला मोकळा

लैंगिक अत्याचाराप्रकरणी शाळेने संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे आवश्यक असताना जाणीवपूर्वक विलंब करत उदासीनता दाखविली. हे प्रकरण गंभीरतेने न हाताळल्याने शिक्षण विभागाची प्रतीमा मलीन झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी आजच खुलासा सादर करण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहेत. हा खुलासा समाधानकारक व वेळेत सादर न केल्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन परिपत्रकाच्या अन्वये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Story img Loader