मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे चहुबाजूंनी टीकेचा भडिमार सुरू झाल्यानंतर मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला. पारतंत्र्यात आपली अनेक वर्षे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आदी महापुरुषांच्या प्रयत्नामुळे भारत आज जगात स्वाभिमानाने उभा आहे, असे कोश्यारी म्हणाले. भारतीय संस्कृती व सभ्यतेचा प्रचार आणि प्रसार करण्यावरही त्यांनी भर दिला. मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील भारतीय विद्याभवनच्या सभागृहात केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली, यांच्यातर्फे भारतीय बौद्धिक संपदा व सांस्कृतिक वारशाचे नवे आयाम या विषयावरील विकास यात्रा या एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, श्री करपात्री धाम वाराणसीचे पीठाधीश स्वामी अभिषेक ब्रह्मचारी, युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह,  तसेच विद्यार्थी व प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा >>> राज्यपाल उद्या दिल्ली दौऱ्यावर; शिवरायांबाबतच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या भेटीगाठींची शक्यता

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sanjay Kelkar and Sanjay Bhoir of Mahayuti reunion in Thane city
संजय केळकर आणि संजय भोईर यांचे मनोमिलन; ठाणे शहरात महायुतीमधील नाराजी अखेरच्याक्षणी दूर
Sharad Pawar Eknath shinde Ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”
Eknath Shinde bag checking
CM Eknath Shinde : “बॅगेत फक्त कपडे, युरिन पॉट…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही सामानांची तपासणी!
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
The decision regarding the permission of the meeting at Shivaji Park Maidan is now with the Urban Development Department mumbai news
शिवाजी पार्क मैदानवरील सभेच्या परवानगीचा निर्णय आता नगरविकास विभागाकडे

राज्यपाल पुढे म्हणाले की, आजकाल आपण केवळ रस्ते, शाळा, रुग्णालये, वीजपुरवठा याला विकास मानतो. परंतु भौतिक प्रगतीच्या पुढे जाऊन मन, बुद्धी व आत्म्याचा विकास होणे ही विकासाची परिभाषा आहे. पारतंत्र्यात आपली अनेक वर्षे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप आदी अनेक थोर महापुरुषांच्या प्रयत्नामुळे भारत आज पुन्हा एकदा जगात स्वाभिमानाने उभा आहे. जगातील लोकांना भारत जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मातृभाषा, संस्कृती व संस्कार जपले पाहिजेत, असे राज्यपालांनी सांगितले.