मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे चहुबाजूंनी टीकेचा भडिमार सुरू झाल्यानंतर मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला. पारतंत्र्यात आपली अनेक वर्षे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आदी महापुरुषांच्या प्रयत्नामुळे भारत आज जगात स्वाभिमानाने उभा आहे, असे कोश्यारी म्हणाले. भारतीय संस्कृती व सभ्यतेचा प्रचार आणि प्रसार करण्यावरही त्यांनी भर दिला. मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील भारतीय विद्याभवनच्या सभागृहात केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली, यांच्यातर्फे भारतीय बौद्धिक संपदा व सांस्कृतिक वारशाचे नवे आयाम या विषयावरील विकास यात्रा या एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, श्री करपात्री धाम वाराणसीचे पीठाधीश स्वामी अभिषेक ब्रह्मचारी, युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह, तसेच विद्यार्थी व प्रतिनिधी उपस्थित होते.
महापुरुषांच्या प्रयत्नामुळे भारत जगात स्वाभिमानाने उभा!; राज्यपालांकडून शिवरायांच्या कार्याचा गौरव
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे चहुबाजूंनी टीकेचा भडिमार सुरू झाल्यानंतर मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-11-2022 at 00:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the program governor bhagat singh koshyari praised the work of shivaji maharaj ysh