मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात मुंबईत पक्षबांधणी करण्याची जबाबदारी पाच विभागप्रमुख आणि तीन विभाग संघटकावर सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात माजी आमदार, माजी बेस्ट समिती अध्यक्ष अशोक पाटील आणि माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. मात्र मंगेश सातमकर यांनी आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट करीत नियुक्तीबाबतच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि पक्षाचे नवनियुक्त सचिव आणि आमदार यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एक विशेष बैठक पार पडली. शिंदे गटाने शिवसेनेप्रमाणेच समांतर अशा नियुक्त्या करण्यास सुरुवात केली असून नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या नियुक्ती केल्या आहेत.
यात भांडुप विक्रोळी, मुलुंड या विभाग क्रमांक ७ मध्ये माजी आमदार अशोक पाटील यांची विभागप्रमुखपदी तर राजश्री मांदविलकर यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक पाटील हे शिवसेनेचे माजी नगरसेवक व बेस्ट समिती अध्यक्ष होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याऐवजी रमेश कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हापासूनच ते नाराज होते.
विभाग क्रमांक ६ येथून माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होते आहे. त्याचबरोबर दादर-माहीम वडाळा या विभाग क्रमांक १० मध्ये विभागप्रमुख म्हणून गिरीश धानुरकर यांची, तर विभागसंघटकपदी प्रिया गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबूर, शीव, अणुशक्ती नगर विभाग क्रमांक ९ च्या विभागप्रमुखपदी अविनाश राणे यांची, तर विभाग संघटकपदी कला शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विभाग क्रमांक १२ मधून दिलीप नाईक यांना विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान –
या सर्व विभागप्रमुख आणि विभाग संघटकाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून त्यांना पक्षविस्ताराचे काम सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.
यापूर्वीच दहिसर, बोरिवली, मागाठाणे या विभाग क्रमांक १ या विधानसभेच्या विभागप्रमुखपदी आमदार प्रकाश सुर्वे यांची, घाटकोपर चांदीवली असल्फा विधानसभा मतदारसंघाच्या विभागप्रमुखपदी आमदार दिलीप लांडे यांची, तर विभाग क्रमांक ११ म्हणजेच भायखळा, शिवडी, वरळी विधानसभा मतदारसंघात विभागप्रमुखपदी माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते.
सोमवारच्या बैठकीला खासदार आणि शिवसेना सचिव राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, माजी स्थायी समिती सभापती यशवंत जाधव, आमदार यामिनी जाधव, शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना सचिव संजय मोरे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदे गटात गेलेलो नाही -मंगेश सातमकर
दरम्यान, मंगेश सातमकर यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. आपण शिंदे गटात गेलेलो नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मी शिवसेनेत ३२ वर्षे आहे आणि मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहीन. पक्षाशी गद्दारी करणार नाही, असेही ते म्हणाले.