लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या तापमानामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. आता या वाढत्या उन्हाच्या पक्ष्यांनाही झळा बसू लागल्या आहेत. मागील दोन दिवसांमध्ये मुंबईत जवळपास १५ पक्षी जखमी झाले आहेत. वाढत्या उन्हाळा उन्हामुळे या पक्षांच्या शरीरातील पाणी कमी होऊन ते झाडावरून किंवा उडताना अचानक खाली पडून जखमी झाले आहेत.

गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारी अंगाची लाहीलाही होत आहे. नागरिकांप्रमाणेच पक्षी व प्राण्यांनाही उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे मागील दोन दिवसांमध्ये मुंबईतील विविध ठिकाणी जवळपास १५ पक्षी जखमी झाले आहेत. यामध्ये १२ कबूतर आणि तीन घारींचा समावेश आहे. या पक्ष्यांचे निर्जलीकरण झाल्यामुळे ते झाडावरून किंवा आकाशात उडताना अचानक खाली पडून जखमी झाले आहेत. या पक्ष्यांवर परळ येथील ‘दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अ‍ॅनिमल’ (बैलघोडा रुग्णालय) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भविष्यात तापमानात वाढ झाल्यास याचा पक्षी व प्राण्यांना अधिक फटका बसण्याची शक्यता रुग्णालयातील डॉ. मयूर डांगर यांनी व्यक्त केली. पक्ष्यांना पाणी मिळावे, त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी घराच्या छतावर, गच्चीवर पाण्याची व्यवस्था करावी असे आवाहनही डॉ. डांगर यांनी केले आहे.ॉ

आणखी वाचा- मुंबई : पश्चिम रेल्वेवर बुधवारपासून अतिरिक्त ११ लोकल फेऱ्या

सध्या वाढत्या तापमानाचा पक्ष्यांना सर्वाधिक फटका बसत आहे. तापमान असेच वाढत राहिल्यास प्राण्यांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राण्यांची काळजी घ्या, पाळीव प्राण्यांना जास्त उन्हात जाऊ देऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. प्राण्यांची नेमकी कशी काळजी घ्यावी याबाबत काही मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. उन्हाळ्यात प्राण्यांना घरामध्ये ठेवा. घरामध्ये ठेवणे शक्य नसल्यास त्यांना सावलीच्या ठिकाणी ठेवा, उष्ण हवामानामुळे पिंजरे लवकर गरम होत असून प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवू नका, प्राण्यांच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवा. त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी द्या. उन्हात गरम झालेले पाणी किंवा अस्वच्छ पाणी पिण्यास देऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.