‘२६/११’च्या मुंबई हल्ल्याचे आणि कटाचे स्वरूप तसेच डेव्हीड हेडलीचा त्यातील सहभाग पाहता अमेरिकन न्यायालयाने सुनावलेली शिक्षा अयोग्य असल्याचे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी शुक्रवारी व्यक्त केले. या प्रकरणी पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या खटल्यामध्ये हेडलीला माफीचा साक्षीदार करण्याचे आणि त्याने दिलेल्या साक्षीच्या आधारे हल्ल्याच्या सूत्रधारांना शिक्षा सुनावली जाण्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत.  अमेरिकेतील खटल्यादरम्यान, कमी शिक्षा सुनावण्याच्या अटीवर भारत तसेच पाकिस्तानने हल्ल्याबाबत सादर केलल्या पुराव्यांबाबत साक्ष देण्याचे हेडलीने मान्य केले होते. ही बाब महत्त्वाची असून पाकिस्तानने  आता त्याला  सुरू असलेल्या खटल्यामध्ये आरोपी बनवावे, एवढेच नव्हे, तर त्याला माफीचा साक्षीदार बनवून हल्ल्याचा मुख्य सूत्रधार व लष्कर-ए-तैय्यबाचा प्रमुख हाफीज सईद याच्याविरुद्ध त्याचा वापर करावा, असेही निकम यांचे मत आहे.

Story img Loader