दिवंगत वली मोहम्मद भामला चौकाची निर्मिती वस्तुंच्या पुनर्वापरातून करण्यात आली असून या पर्यावरणप्रेमी चौकाचं उद्घाटन इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक गोयंका व पद्मश्री डी. वाय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, खासदार पूनम महाजन, प्रिया दत्त, भाजपाचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रताप सरनाईक, आरीफ नसीम खान व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष सचिन अहीर उपस्थित होते. दिवंगत वली मोहम्मद भामला हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अल्पसंख्याक व मागासवर्गातील जनतेच्या उद्धारासाठी तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अथक परीश्रम घेतले होते.

Story img Loader