मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. मिरवणुकीत गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जमलेल्या सहभागी गणेशभक्तांचे किमती साहित्य चोरी गेले आहे. त्यामुळे गर्दीचा फायदा घेत चोरीसाठी चोरट्यांची टोळी सक्रीय असल्याचं समोर आलं. शुक्रवारी (९ सप्टेंबर) मिरवणुकीत जवळपास ५० मोबाईल फोन, सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र चोरीला गेले. त्यामुळे गणेशभक्तांना धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिरवणुकीत मोबाईल, सोन्याचे दागिणे असे किमती साहित्य चोरीला गेल्याचं लक्षात येताच या चोरीची तक्रार देण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात गणेशभक्तांनी रांग लावली. मोबाईल हरवल्याची तक्रार आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात पोलीसही व्यग्र झालेले पाहायला मिळाले.

लालबागचा राजा गणपती मिरवणुकीत मोठी गर्दी जमली आणि चोरांनी गर्दीचा फायदा घेऊन अनेक गणेशभक्तांचं किमती साहित्य चोरलं. या सर्व घटना दुपारी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे पीडितांनी सांगितले.

हेही वाचा : दुबईतून नागपुरात सोन्याची तस्करी, विमानातून उतरताच तिघांनी केली लुटमार

काळाचौकी पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच झारखंडमधून गणपती उत्सवादरम्यान मोबाईल चोरी करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना अटक केली होती. आता लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरी करण्याच्या घटनांमध्ये कुणाचा समावेश आहे हे शोधणं पोलिसांसमोरचं आव्हान असणार आहे.